सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त कोल्हापूर येथे भव्य ‘हिंदु एकता दिंडी’ !

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या आणि श्री महालक्ष्मीदेवीच्या कृपेने पावन झालेल्या करवीरनगरीत १० मे या दिवशी भव्य अशा ‘हिंदु एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदूऐक्याचा जागर !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने विविध संप्रदाय, आध्यात्मिक संस्था यांसह ३ सहस्र ५०० हून अधिक हिंदूंचा सहभाग. हिंदूंसाठी आज नाही, तर कधीच नाही अशी धोक्याची घंटा वाजली आहे ! – अभय वर्तक, प्रवक्ते, सनातन संस्था

फलक आणि डिजिटल स्क्रीन यांद्वारे मुंबईत श्री राजमातंगी महायज्ञ सोहळ्याचा प्रभावी प्रचार !

सनातन संस्थेच्या वतीने १७ मे या दिवशी प्रभादेवी येथील नर्दुल्ला टँक मैदानावर दुपारी ३.३० ते ७.३० या वेळेत श्री राजमातंगी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. अधिकाधिक भाविकांना या यज्ञाचा लाभ व्हावा, यासाठी मुंबई आणि उपनगर यांमध्ये फलक अन् डिजिटल स्क्रीन यांद्वारे अत्यंत प्रभावी प्रचार होत आहे.

सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात ‘आयुष्य होम’ पार पडला

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळावा आणि त्यांना चांगले आरोग्य लाभावे, तसेच साधकांनाही चांगले आरोग्य लाभावे अन् त्यांची साधना चांगली होऊन त्यांचे रक्षण व्हावे’, या उद्देशाने सप्तर्षी जीवनाडीपट्टीत उल्लेख केल्याप्रमाणे येथील सनातनच्या आश्रमात ८ मे या दिवशी ‘आयुष्य होम’ भावपूर्ण वातावरणात पार पडला.

सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या शुभहस्ते मुंबईत श्री महागणपति आणि भूमी पूजन !

श्री गणेशाच्या कृपाशीर्वादाने ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या शुभहस्ते ७ मे या दिवशी यज्ञाच्या नियोजित पटांगणावर विघ्नहर्ता श्री महागणपति आणि भूमाता यांचे पूजन करण्यात आले.

सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात श्री चंडी होम पार पडला

‘हिंदु राष्ट्राची लवकरात लवकर स्थापना व्हावी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना चांगले आरोग्य लाभावे आणि साधकांची साधना चांगली होऊन त्यांचे रक्षण व्हावे’, या उद्देशाने सप्तर्षी जीवनाडीपट्टीत उल्लेख केल्याप्रमाणे येथील सनातनच्या आश्रमात ६ मे या दिवशी श्री चंडी होम भावपूर्ण वातावरणात पार पडला.

सनातनच्या आश्रमांत पावसाळ्याच्या पूर्वसिद्धतेसाठी खालील साहित्याची आवश्यकता !

आश्रम परिसरातील सर्व साहित्य सुस्थितीत रहाण्याकरता तात्पुरत्या निवारा शेड बनवायच्या आहेत. त्यासाठी फ्लेक्स, प्लास्टिक आणि ‘सिलपोलिन’ यांची, तसेच लोखंडी अन् प्लॅस्टिक पत्र्यांची (‘कॉरुगेटेड शीट्स’ची) आवश्यकता आहे…

भारतीय संत महापरिषदेच्या संत समन्वयक स्वामिनी उन्मेष भारती यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

भारतीय संत महापरिषदेच्या संत समन्वयक आणि कैलास मठाच्या प्रतिनिधी स्वामिनी उन्मेष भारती यांनी २४ एप्रिल या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. त्या बेंगळुरूच्या श्री राजराजेश्वरी मंदिर येथील रहिवासी आहेत.

सनातनचा आश्रम देशभरातील हिंदूंना योग्य दिशा देण्याचे काम करतो ! – खासदार डॉ. अनिल बोंडे

देशभरातील तरुणांना आणि तरुणींना योग्य दिशा दाखवण्याचे काम सनातन संस्था करते, असे गौरवोद्गार अमरावती येथील भाजपचे राज्यसभेचे खासदार तथा महाराष्ट्राचे माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी रामनाथी (फोंडा, गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला नुकतीच सदिच्छा भेट दिल्यावर काढले.

अधिक मासात सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ इतरांना देऊन सर्वश्रेष्‍ठ अशा ज्ञानदानाचे फळ मिळवा !

इतरांना देण्‍यासाठी सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ हवे असल्‍यास त्‍यांची मागणी लवकरात लवकर स्‍थानिक वितरकांकडे करावी अथवा https://sanatanshop.com/shop/ या लिंकवर नोंदवावी.