मला Paranoid personality disorder (टीप) हा मानसिक विकार आहे. त्यावर उपाय म्हणून सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी मला ‘श्री गणेशाय नमः । श्री गुरुदेव दत्त । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय ।’, हा नामजप प्रतिदिन २ घंटे करायला सांगितला. २ मास हा नामजप केल्यावर मला स्वतःत शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर पालट जाणवले. ते पुढे दिले आहेत.
टीप – Paranoid personality disorder : या मानसिक विकारात व्यक्तीला इतरांबद्दल तीव्र अविश्वास आणि संशय असतो. त्यामुळे तिचे नातेसंबंध आणि दैनंदिन जीवन प्रभावित होते.

१. शारीरिक स्तरावरील पालट
यापूर्वी मला दिवसातून ४ – ५ वेळा खायला लागायचे आणि सतत भूक लागलेली असायची, तसेच त्रास वाढल्यावर मी अधिक खायचो. जानेवारी २०२३ पासून मला खाण्यावर नियंत्रण ठेवता येते. आता माझे दिवसातून केवळ २ किंवा अधिकाधिक ३ वेळा खाणे होते. स्वतःच्या खाण्यावर नियंत्रण आल्याने मागील ४ मासांत माझे वजन ८ किलो न्यून झाले आहे.
२. मानसिक स्तरावरील पालट
अ. माझे प्रसंगात अडकून रहाण्याचे प्रमाण ८० टक्के न्यून झाले आहे.
आ. मला अनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष करणे काही प्रमाणात शक्य होते.
इ. मला सहसाधक आणि उत्तरदायी साधक यांची प्रकृती स्वीकारता येते अन् त्यामुळे त्यांच्याकडून होणार्या अपेक्षेचे प्रमाण ५० ते ६० टक्के उणावले आहे.
ई. आता ५० टक्के वेळा संघर्षाच्या प्रसंगात मनाला न पटणारे एखादे सूत्र ‘ईश्वरेच्छा’ म्हणून मला स्वीकारता येते आणि मन शांत ठेवता येते.
उ. आता मला आतून शांत वाटते.
ऊ. सेवा करतांना पूर्वीच्या तुलनेत माझा उत्साह वाढला आहे.
३. बौद्धिक स्तरावरील पालट
आता सेवेत निर्णय घेतांना माझ्या मनात स्पष्टता असते. यापूर्वी माझ्या मनाचा पुष्कळ गोंधळ असायचा.
४. आध्यात्मिक स्तरावरील पालट
अ. माझा त्रास वाढला, तरी आता ९० टक्के वेळा १ – २ घंट्यांतच त्यातून बाहेर पडता येते.
आ. आता मला भावजागृतीचे प्रयत्न करणे शक्य होते. यापूर्वी माझ्याकडून तसे प्रयत्न होत नव्हते.
इ. ‘माझा कृतज्ञताभाव वाढला आहे’, असे मला जाणवते. सध्या बर्याचदा भूतकाळातील माझी स्थिती आठवून ‘त्यातून भगवंताने मला कसे वाचवले ? मला कसे सांभाळले ? आणि योग्य मार्ग कसा दाखवला ?’, याबद्दल मला कृतज्ञता वाटते अन् माझी भावजागृती होते.
ई. आता मला सेवेतील आनंद अधिक अनुभवता येतो.
उ. मला स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया पूर्वीच्या तुलनेत नियमित राबवता येत आहे. ‘स्वभावदोषांची सारणी लिहिणे, सत्र करणे, फलकावर चुका लिहिणे’, हे सर्व प्रयत्न करण्याची माझी तळमळ आतून वाढली आहे’, असे मला जाणवते.’
– एक साधक, फोंडा, गोवा. (४.११.२०२३)
‘डिसीझ एक्स’ या घातक अशा संभाव्य महामारीवर करावयाचा नामजप
सनातन संस्था निर्मित ‘गणेश पूजा आणि आरती’ अॅपवरील ‘ऑडियो’ लावून पूजा करतांना आलेली अनुभूती !
‘ऑनलाईन’ साधना सत्संगा’त उपस्थित रहाणार्या पुणे येथील जिज्ञासूंनी केलेले प्रयत्न, त्यांना स्वतःत जाणवलेले पालट आणि...
देवघरातील ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या छायाचित्रात झालेले पालट आणि आलेल्या अनुभूती
वैश्विक महामारीसारख्या आपत्काळात कठीण प्रसंगांना सामोरे जातांना अनुभवलेले गुरुकृपेचे कवच