पुण्यात ‘सीजेपी आंदोलनात अर्बन नक्षलवाद’ या विषयावर परिसंवाद पार पडला

न्यायव्यवस्था, सैन्य आणि शिक्षण व्यवस्था यांवरील डाव्यांचे आक्रमण उधळून लावा ! – अधिवक्ता सत्येंद्र मुळे, मुंबई उच्च न्यायालय

पुणे, २१ ऑगस्ट – लोकशाहीची मूळ संकल्पना हिंदु धर्माने जगाला दिली आहे. भारत हा अत्यंत मुक्त विचारांचा देश आहे; मात्र डावी विचारधारा आपल्या प्रगतीत अडथळे आणत आहे. ‘अवॉर्ड वापसी गँंग’, नर्मदा बचाव आंदोलन आणि शेतकरी आंदोलन सारख्या घटनांमुळे देशाच्या विकासाची कामे दशकानुदशके रखडली गेली. लोकशाहीच्या स्तंभांवर म्हणजेच न्यायव्यवस्था, सैन्य, प्रसारमाध्यमे आणि शिक्षण व्यवस्थेवर जाणीवपूर्वक आक्रमणे केली जात आहेत. ‘जेन झी’ (वर्ष १९९७ ते २०११ या कालावधीत जन्मलेली मुले) पिढीला भ्रमणभाष आणि इंटरनेट लवकर मिळाले आहे. या पिढीला ‘सोशल मीडिया’मुळे माहिती लवकर मिळते; परंतु त्या माहितीचे विश्लेषण करण्याची क्षमता त्यांच्याकडे अल्प असू शकते.

मार्गदर्शन करतांना श्री. सत्येंद्र मुळे

जंतर-मंतर सारख्या ठिकाणची आंदोलने त्यांना थेट दिसतात; पण त्यामागचे षड्यंत्र त्यांना समजत नाही. आपल्याला केवळ सरकारवर अवलंबून न रहाता देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी स्वत:चे योगदान कायम द्यावेच लागेल. यासाठी युवा पिढीला आणीबाणी, मोगल साम्राज्याच्या व्यतिरिक्तचा इतिहास आणि प्रगतीला होणारा विलंब यांची माहिती दिली पाहिजे. असे विधान मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता सत्येंद्र मुळे यांनी केले.

सनातन संस्थेच्या वतीने आयोजित ‘सीजेपी आंदोलनात अर्बन नक्षलवाद ?’ या विषयावर पुण्यातील ‘माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालया’तील गणेश सभागृह येथे परिसंवाद पार पडला. या कार्यक्रमाला सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक, सामाजिक आणि राजकीय विश्लेषक श्री. सर्वेश मेहेंदळे हे उपस्थित होते.

मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ नितीन प्रधान, तसेच हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी व्हिडिओ पाठवून त्याद्वारे विचार मांडले. कार्यक्रम चालू होण्यापूर्वी दाभोलकर हत्येप्रकरणात जामीन मिळालेले सचिन अंदुरे यांचे अधिवक्ता नितीन प्रधान यांनी चलचित्राद्वारे पाठवलेले मनोगत दाखवण्यात आले. या कार्यक्रमाला ‘ज्येष्ठ नागरिक संघा’चे श्री. माधव वाणी, पुणे सार्वजनिक सभेचे श्री. विद्याधर नारगोलकर, विश्व हिंदु परिषदेचे श्री. महेंद्र देवी, सावरकरप्रेमी श्री. ज्ञानेश क्षीरसागर, ‘स्वयंभू रामेश्वर देवस्थान ट्रस्ट’चे विजय माझिरे यांच्यासह ३०० हून अधिक नागरिक उपस्थित होते.

‘अर्बन नक्षलवादा’चा कर्करोग वैचारिक शस्त्रकर्मानेच दूर होईल ! – अभय वर्तक, प्रवक्ते, सनातन संस्था

मार्गदर्शन करतांना श्री. अभय वर्तक

पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ‘दिमागी नक्षलवादापासून सावध रहा’ असे सांगत देशाला अतिशय महत्त्वाचा संदेश दिला. साम्यवाद, ‘अर्बन नक्षलवाद’ म्हणजे भारतीयत्वाला, देशाला होत असलेला मेंदूचा कर्र्करोग आहे. असे म्हणतात की, मेंदूचा कर्करोग दूर करायचा असेल, तर शस्त्रकर्माविना पर्याय नाही. आपल्यालासुद्धा हे शस्त्रकर्म वैचारिक, बौद्धिक स्तरावर करावे लागेल. साम्यवाद्यांचे बुरखे फाडून ‘जेन झी’ (वर्ष १९९७ ते २०११ या कालावधीत जन्मलेली मुले) पिढी समोर साम्यवाद्यांचे सत्य आणून दाखवावे लागेल.

साम्यवाद्यांचा दुतोंडीपणा आपण समजून घेऊन पुढच्या पिढीला सांगणे, हेच आपले कर्तव्य आहे. सनातन संस्थेने याच अर्बन नक्षलवादाच्या वैचारिक भ्रम पसरवण्याच्या कौशल्याचा अनेक वर्षे अनुभव घेतला आहे. आज सीजेपीचा उद्देश तोच असून उद्या यांची सत्ता आल्यास ‘पुण्यातील शनिवारवाडा हा ब्राह्मणी विचारांचे प्रतीक’, असे सांगत शनिवारवाडा विकायलाही मागे-पुढे पहाणार नाहीत, अशी यांची विकृत विचारसरणी आहे.

‘सीजेपी’ आंदोलनामागे परकीय निधी आणि डाव्या संघटनांचे षड्यंत्र ! – सर्वेश मेहंदळे

सोनम वांगचूक यांच्या नावावर ३०० नव्हे, तर केवळ एकच पेटंट आहे; त्यांच्या ‘सेकमोल’ या संस्थेचा ‘एफ्.सी.आर्.ए.’ परवाना सरकारने रहित केला आहे.

सीजेपी आंदोलनाला ‘आयसा’ (डाव्या विचारसरणीची मुख्य विद्यार्थी संघटना), ‘एस्.एफ्.आय.’ आणि काही ख्रिस्ती मिशनरी संघटनांनी पाठिंबा दिला असून परकीय निधीविषयक कायद्यातील कठोर पालटांना विरोध करणे, हाच ‘सीजेपी’ आंदोलनामागे मुख्य उद्देश होता.

अर्बन नक्षलवादाचे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी कृतीशील व्हा, जागरूक रहा ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

आज देशात गांधी हत्येनंतर पुढे हत्याच झाल्या नाहीत आणि त्यानंतर ४ पुरोगाम्यांच्या हत्या झाल्या, असे वातावरण निर्माण करण्याचे काम अर्बन नक्षलवाद्यांनी केले. प्रत्यक्षात केवळ भारतामध्ये नक्षलवाद्यांनी १४ सहस्रांहून अधिक हत्या केल्या आहेत.

यावर अर्बन नक्षलवादी बोलत नाहीत, बोलणार नाहीत. दाभोलकर हत्या प्रकरणात आम्ही हेच अनुभवले. या प्रकरणात आज एका निष्पाप हिंदुत्वनिष्ठाला जामीन मिळाला. या प्रकरणातील अनेक त्रुटी आम्ही न्यायालयासमोर मांडल्या आहेत. अर्बन नक्षलवादाचे हे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी आपण सर्वांनीच कृतीशील व्हा, जागरूक रहा !

ज्येष्ठ विधीज्ञ नितीन प्रधान (दाभोलकर हत्या प्रकरणात अडकवण्यात आलेले सचिन अंदुरे यांचे अधिवक्ता) यांचे मनोगत

अधिवक्ता नितीन प्रधाननिष्पाप हिंदुत्वनिष्ठांची झालेली हानी कोण भरून देणार ? – ज्येष्ठ विधीज्ञ नितीन प्रधान

दाभोलकर हत्या प्रकरणातील अन्वेषण आणि नंतर झालेले ‘ट्रायल’ (सुनावणी) हे सर्व न्यायव्यवस्थेतील एक विचित्र प्रकरण आहे. ज्या यंत्रणेने हे अन्वेषण केले, त्या यंत्रणेच्या अधिकार्‍यांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला; मात्र आज या प्रकरणात ज्यांची सुटका झाली, ते अनेक वर्षे कारागृहात न केलेल्या गुन्ह्यासाठी शिक्षा भोगत होते. त्यांच्याकडे, त्यांच्या कुटुंबियांकडे समाजात अनाहुतपणे निर्माण झालेली तिरस्काराची भावना, त्यांची झालेली इतक्या वर्षांची हानी कोण भरून देणार ? सरकार आणि समाज यांनी या प्रश्नाचे उत्तर द्यायला हवे.

⚖️ “Who Will Compensate for the Losses Suffered by Innocent Hindutva Activists?”

At the seminar “Urban Naxalism in CJP Protests?”, organised by @SanatanSanstha in Pune, Senior Advocate Nitin Pradhan raised serious questions about the #Dabholkarmurder case.

🔹 He described the… pic.twitter.com/EG7xHDOeNd

— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 22, 2026

 

परिसंवादात उपस्थित नागरिक

या वेळी उपस्थित नागरिकांनी कार्यक्रमस्थळी उपलब्ध असलेली श्री. विक्रम भावे लिखित ‘दाभोलकर हत्या आणि मी, मालेगाव बाँबस्फोटामागील अदृश्य हात’ या पुस्तकांचाही लाभ घेतला.

कार्यक्रमाच्या आरंभी मान्यवर वक्त्यांचे स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. दिनेश माझिरे यांनी अधिवक्ता सत्येंद्र मुळे यांचा सत्कार केला. हिंदु जनजागृती समितीचे भुकूम शाखा सेवक श्री. अमोल घारमाळकर यांनी श्री. अभय वर्तक यांचा सत्कार केला. श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर (मारणेवाडी) विश्वस्त श्री. जानकीराम जगताप यांनी श्री. सर्वेश मेहंदळे यांचा सत्कार केला. त्यानंतर मान्यवर वक्त्यांनी मार्गदर्शन केले. शेवटी परिसंवादामध्ये श्री. सर्वेश मेहेंदळे यांनी मान्यवरांना प्रश्न विचारले. विशेष म्हणजे ‘जेन झी’ पिढीतील युवक-युवतींनीही या परिसंवादात सहभागी होऊन मान्यवर वक्त्यांना प्रश्न विचारले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ज्योती काळे यांनी केले. कार्यक्रमस्थळी सनातन संस्थेचे ग्रंथ प्रदर्शनही लावण्यात आले होते.

कार्यक्रमाचे परिसंवादात रूपांतर झाल्यानंतर श्री. सर्वेश मेहेंदळे यांनी प्रश्न विचारत दोन्ही वक्त्यांकडून अर्बन नक्षलवादाच्या संकटाची उकल केली.

१. परकीय निधी आणि त्याद्वारे होणार्‍या ‘षड्यंत्रा’ विषयी काय सांगाल ?

उत्तर (अभय वर्तक) : वर्ष २०१५ ते २०१९ या कालावधीत मुंबईत ४ सहस्र ५८४ कोटी, पुण्यात १ सहस्र ४६७ कोटी आणि संभाजीनगरमध्ये ३ सहस्र ७०६ कोटी रुपये अशा मोठ्या प्रमाणात परकीय निधी आला. या पैशांचा वापर देश तोडण्यासाठी केला जात आहे. यासाठीच पंतप्रधानांनी यावर कायदा करण्याचा प्रयत्न केला असता अमेरिकेने त्याला विरोध केला. दाभोलकर यांच्या ‘परिवर्तन’ ट्रस्टनेही ‘एफ्.सी.आर्.ए.’ अंतर्गत पैसे घेतले आणि त्याचा उपयोग भलत्याच ठिकाणी केला. नंतर दाभोलकर यांच्या संघटनेत याच वादावरून फूट पडल्याचे आपल्याला पहायला मिळाले.

२. देश पातळीवर या ‘अर्बन नक्षलवादा’चे संकट रोखण्यासाठी प्रयत्न कसे होत आहेत ?

हा प्रश्न उपस्थित करतांना श्री. सर्वेश मेहेंदळे यांनी सोनम वांगचुक यांच्या संस्थेचे ‘एफ्सीआर्ए’ लायसन्स (अनुज्ञप्ती) रहित करण्यात आल्याचे सांगितले. यावर उत्तर देतांना अधिवक्ता सत्येंद्र मुळे म्हणाले की, ‘केवळ मोदी किंवा अमित शहा हे देश वाचवतील, यावर अवलंबून न रहाता आपण सर्वांनीच जागरूक होणे अन् देशाचे नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडणे आवश्यक आहे. भारत कायमस्वरूपी ‘इलेक्शन मोड’मध्ये असल्यामुळे विकासकामांना वेळ मिळत नाही. त्यामुळे देशाच्या स्थिरतेसाठी आणि आंदोलनजीवी लोकांच्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी ‘वन नेशन वन इलेक्शन’ दिशेने वाटचाल करणे आवश्यक आहे.

३. डावी विचारधारा प्रामुख्याने ‘जेन झी’ला का लक्ष्य करत आहे ?

उत्तर (अधिवक्ता मुळे) : १४ ते १७ वयोगटांतील मुले ही भविष्यातील लोकसंख्येचा ५७ टक्के इतका मोठा भाग असणार आहेत. या तरुण पिढीची दिशाभूल करून त्यांना ‘बिनपगारी सैनिक’ बनवणे आणि वर्ष २०४७ पर्यंतचा भारताचा विकास (अमृत काळ) रोखणे, हा या विचारधारेचा ‘अजेंडा’ असल्याने ‘जेन झी’ ला लक्ष्य केले जात आहे.

४. डाव्या विचारधारेकडे आध्यात्मिक दृष्टीकोनातून कसे पाहिले जाते ?

उत्तर (अभय वर्तक) : अध्यात्मशास्त्रानुसार विघटनवादी प्रवृत्ती ही तामसिक प्रवृत्ती मानली असून शांतता, धैर्य आणि एकात्मता ही प्रवृत्ती सात्त्विक मानली आहे. डावी विचारधारा ही मुळातच विघटनवादी विचारधारा आहे. त्या विचारधारेला केवळ विध्वंस आणि अराजकता निर्माण करायचे असते. याउलट सत्त्वगुणी व्यक्तींनी संघटित होऊन या प्रवृत्तींवर विजय मिळवणे आवश्यक आहे, जसे श्रीकृष्णाने अर्जुनाला सिद्ध केले होते.

Leave a Comment

Logged in as Sanatan Sanstha. Edit your profile. Log out? Required fields are marked *