१२ ज्योतिर्लिंगांपैकी प्रथम असलेल्या मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दिव्य अंश सनातन संस्थेला अर्पण !

तंजावर येथील वेदप्रचाररत्न वेदकुलपती जी.के. सीतारामन्गुरुजी यांनी मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दिव्य अंशांपैकी ४ दिव्य अंश सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी केले अर्पण ! सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या ४ दिव्य अंशांचे रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात आगमन !

व्यसन आणि व्यसनमुक्तीसाठी मानसोपचार आणि आध्यात्मिक स्तरावरील उपचार

व्यसनमुक्ती हा केवळ औषधांचा विषय नसून तो मनाच्या पुनर्रचनेचा आणि आध्यात्मिक त्रासांचा विषय आहे. आधुनिक विज्ञान शरिरावरील उपचार करील; पण अध्यात्मशास्त्र मनाचा कायापालट करील. नामजप, स्वयंसूचना आणि सात्त्विक जीवनशैली यांच्या समन्वयातून आपण एक व्यसनमुक्त, सुदृढ आणि आनंदी समाज घडवू शकतो.

भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्‍वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !

या सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवर, संत-महंत, हिंदुत्वनिष्ठ आणि मंदिर विश्वस्त यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने भारताचा सर्वांगीण विकास आणि शत्रूंच्या नाशासाठी सामूहिक प्रार्थना केली.

भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’

भारताला अभेद्य आध्यात्मिक संरक्षककवच लाभावे आणि देशाची सर्वांगीण प्रगती होऊन पुन्हा एकदा ‘रामराज्या’चा उदय व्हावा, या संकल्पपूर्तीसाठी सनातन संस्थेच्या वतीने मुंबईत ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी, १७ मे २०२६ रोजी प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या पाठीमागे असलेल्या नर्दुल्ला टँक मैदानावर दुपारी ३.३० ते सायं. ७.३० या वेळेत हा यज्ञ सोहळा अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न होणार आहे.

मुंबईत होणार्‍या श्री राजमातंगी महायज्ञाचा ठिकठिकाणी बैठकांद्वारे प्रसार !

मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि रायगड या ठिकाणच्या शहरी भागांमधील सोसायटी, तर ग्रामीण भागांमध्ये गावागावांत, तसेच वाड्यांमध्ये बैठका घेऊन महायज्ञाचा प्रसार करण्यात येत आहे. यज्ञाच्या प्रसारासाठी आतापर्यंत २४३ कुटुंब बैठका, तर २५ हून अधिक सामूहिक बैठका घेण्यात आल्या. याद्वारे सहस्रो जिज्ञासूंपर्यंत महायज्ञाचे महत्त्व पोचवण्यात आले आहे.

चिपळूण-पाग येथील श्री सुकाईदेवी मंदिरात सनातन संस्था आयोजित संस्कार प्रशिक्षण वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘सनातन संस्था’ आणि ‘मंदिर महासंघ’ यांच्या वतीने शहरातील पाग येथील श्री सुकाईदेवी मंदिरात ५ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्गाचे’ आयोजन करण्यात आले होते. ९ ते १५ या वयोगटातील मुलांसाठी ६ ते १० मे २०२६ या कालावधीत सकाळी ९ ते १२ या वेळेत घेण्यात आलेल्या या संस्कार वर्गात ४० मुलांनी सहभाग घेतला.

मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !

महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांना सनातन संस्थेच्या वतीने १७ मे या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण देण्यात आले. महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांना सनातन संस्थेच्या वतीने मुंबईत होणार्‍या श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण देण्यात आले.

विविध मंदिरांतील देवतांच्या चरणी सनातन संस्था आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञा”ची निमंत्रणपत्रिका अर्पण !

मुंबई येथील जागृत आणि स्वयंभू श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन सनातनच्या साधकांनी गणेशाच्या चरणी श्री राजमातंगी महायज्ञाची निमंत्रणपत्रिका अर्पण केली.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त कोल्हापूर येथे भव्य ‘हिंदु एकता दिंडी’ !

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या आणि श्री महालक्ष्मीदेवीच्या कृपेने पावन झालेल्या करवीरनगरीत १० मे या दिवशी भव्य अशा ‘हिंदु एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदूऐक्याचा जागर !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने विविध संप्रदाय, आध्यात्मिक संस्था यांसह ३ सहस्र ५०० हून अधिक हिंदूंचा सहभाग. हिंदूंसाठी आज नाही, तर कधीच नाही अशी धोक्याची घंटा वाजली आहे ! – अभय वर्तक, प्रवक्ते, सनातन संस्था