भारतियांचे अत्यंत प्रगत प्राचीन जलव्यवस्थापन आणि पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे निर्माण झालेले पाण्याचे दुर्भिक्ष्य !
जगातील पहिले ज्ञात आणि सध्याही वापरात असलेले धरण भारतात आहे, हे आपल्यापैकी किती जणांना माहिती असेल ? इसवी सन दुस-या शतकात चोल राजा करिकलन यांनी बांधलेला ‘अनईकट्टू’ अथवा इंग्रजी भाषेत ‘ग्रँड अनिकट’ (Grand Anicut) किंवा आजच्या बोली भाषेत ‘कल्लानाई बांध’ हा असून तो गेली १८०० वर्षे वापरात आहे.