‘हनुमान जन्मोत्सव’ म्हणण्याऐवजी ‘हनुमान जयंती’ म्हणणेच योग्य !

 

‘हनुमान चिरंजीव असल्याने त्याची जयंती साजरी करण्याऐवजी जन्मोत्सव साजरा करा’, अशा आशयाची चौकट सध्या सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत आहे. याविषयी परात्पर गुरु पांडे महाराज यांनी शास्त्रोक्त परिभाषेत सांगितलेले स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे आहे.

‘जयंती’ म्हणजे देवाचा जन्मदिवस !

(संदर्भ : शालेय संस्कृत शब्दकोश, संपादक – श्री. मिलिंद दंडवते, प्रकाशक – वरदा बुक्स, पुणे -१६)

‘हनुमान’ ही शाश्‍वत चैतन्य शक्ती आहे; म्हणून ती शक्ती चिरंजीव आहे. ही शक्ती अंजनीच्या माध्यमातून प्रकटली. या शक्तीने प्रकट झाल्यावर सूर्याच्या प्राप्तीसाठी झेप घेतली. रामायण काळात काही विशिष्ट उद्देशाने विशिष्ट कार्यासाठी ‘हनुमान’ किंवा ‘मारुति’ या नावाने ती शक्ती कार्यरत झाली.

त्यामुळे ‘हनुमान जयंती’ असे म्हणणेच योग्य राहील ! तसेच हा प्रघातही आहे.’

जयंती शब्दाचा संस्कृत अर्थ आहे – जयं पुण्यंं च कुरूते – जयन्तीमिति तां विदुः । (स्कंद, तिय्यादी खण्ड)

जे साजरे केल्याने जय आणि पुण्य मिळते, त्याला जयंती म्हणतात. जयंती शब्दाचा वापर शास्त्र आणि पुराणांमध्ये आढळतो. म्हणजे जयंती शब्द पण शास्त्रीय आहे.

रोहिणी सहिता कृष्ण मासे च श्रावणेष्टमी ।
अर्धरात्रादधश्चोर्ध्वं कायावि यदा भवेत् ।।
जयंती नाम सा प्रोक्ता सर्वमापप्रणाशिती ।।

हनुमान जयंती प्रमाणे अन्य अनेक देवतांची देखील जयंती साजरी केली जाते. उदा. श्रीकृष्ण जयंती, दत्त जयंती, वामन जयंती, परशुराम जयंती, नृसिंह जयंती, व्यास जयंती, नारद जयंती, नर्मदा जयंती, यमुना जयंती इत्यादी. परशुराम देखील हनुमानाप्रमाणे चिरंजीव आहेत, आणि त्यांची पण जयंती साजरी होते.

अर्थात जयंती शब्द सार्थक आणि व्याकरण दृष्ट्या शुद्ध आहे.

या कारणांमुळे हनुमान जयंती शब्दप्रयोग करणे योग्य आहे.

2 thoughts on “‘हनुमान जन्मोत्सव’ म्हणण्याऐवजी ‘हनुमान जयंती’ म्हणणेच योग्य !”

  1. माफ करा पण जर हनुमान आणि शक्ती जरी वेगवेगळ्या केल्या तरीही हनुमान अजर अमर आहे आणि शक्ती म्हणजे ऊर्जा आणि ऊर्जा कधीही नष्ट होत नाही तर ती रुपांतरीत होतो मग जे नष्ट होत नाही त्याची जयंती कसली हा माझा पहिला मुद्दा

    2 दुसरा मुद्दा असा आपण बाळाचा जन्म झाल्यावर आपण त्याचा वाढदिवस साजरा करतो आणि मृत्यू झाल्यावर आंत विधी करतो मग आणि तोच महापुरुष असेल तर त्याची मृत्यू झालेला दिवशी त्याची जयंती करतो
    मग माझा असा मुद्दा आहे श्री हनुमान यांचा जन्म दिवशी त्यांनी जयंती कशी काय

    माझा या दोन मुद्याचे स्पष्टीकरण द्यावे अन्यथा हे पोस्ट डिलीट करावे माझे बोलणे चुकीचे असल्यास आपण मला माफ करा पण आपण सनातनी आहोत आणि आपणच आपल्या देवांची विटंबना करावी है शोभत नाही माझे बोलेने चुकीचे असल्यास माफ करा पण जरा विचार करावा

    Reply
    • नमस्कार श्री. सुरज गिरीजी,

      जयंती आणि जन्मोत्सव हे समानार्थी शब्द आहेत.

      Reply

Leave a Comment