पीडितांचे दुःख निवारणारे साखळी, गोवा येथील दत्त देवस्थान !

सांखळी येथील लक्ष्मण म्हाळू कामत या दत्तभक्ताला स्वप्नदृष्टांंत होऊन दत्त महाराजांनी जे आश्‍वासन दिले होते, ते पूर्ण करून दत्त महाराज वास्तव्यास आले, ते म्हणजे सांखळी येथील प्रसिद्ध दत्त देवस्थान !

माणगाव येथे प.प. टेंब्येस्वामी यांनी स्थापन केलेले श्री दत्तमंदिर

इ.स. १८८३, वैशाख शुक्ल पक्ष पंचमी १८०५ यावर्षी माणगावात स्वतः टेंब्येस्वामींनी दत्तमंदिराची स्थापना केली. श्री दत्तमंदिर परिसराला तीर्थक्षेत्राचे स्वरूप आले आहे.

श्री क्षेत्र दत्तवाडी, केपे, गोवा येथे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले श्री दत्तमंदिर

श्री क्षेत्र दत्तवाडी, केपे येथे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी श्री दत्तमंदिर वसलेले आहे. या मंदिराचा इतिहास, स्थान महात्म्य आणि उत्सव यांविषयी जाणून घेऊया.

दत्ताची प्रमुख तीर्थक्षेत्रे

दत्ताची सर्वच तीर्थक्षेत्रे अत्यंत जागृत आहेत. या तीर्थक्षेत्रांना भेट दिल्यानंतर शक्तीची अनुभूती कित्येक भक्तांना येते.

श्रीक्षेत्र राक्षसभुवन येथील श्री पांचाळेश्‍वर मंदिराचा इतिहास आणि माहात्म्य

‘महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील श्रीक्षेत्र राक्षसभुवन येथे गोदावरीच्या पात्रात श्री पांचाळेश्वर मंदिर आहे.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी स्थापन केलेले शेवगाव येथील जागृत दत्तमंदिर !

गाभार्‍यातील प्रसन्न, बोलकी, निरागस आणि वात्सल्यमय तेजस्वी मूर्ती योगतज्ञ दादाजींनी स्वत: जयपूर येथे जाऊन बनवून आणली आहे. २४.५.२००६ या दिवशी त्यांच्या हस्तस्पर्शाने दत्तमूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा मंगलमय वातावरणात झाला होता.

श्रीक्षेत्र राक्षसभुवन येथील आद्य दत्तपीठ : वरद दत्तात्रेय मंदिर !

‘महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील श्रीक्षेत्र राक्षसभुवन येथे गोदावरीच्या पात्रात श्री पांचाळेश्वर मंदिर आहे. श्री नृसिंह सरस्वती यांनी गुरुचरित्रात या स्थळाचा उल्लेख केलेला आहे. ‘येथे श्री दत्तगुरु प्रतिदिन दुपारच्या भोजनासाठी सूक्ष्मातून येतात’, असे या क्षेत्राचे माहात्म्य आहे.

श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या वास्तव्याने पुनित झालेले कर्नाटक मधील जागृत तीर्थक्षेत्र कुरवपूर !

कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात वसलेले कुरवपूर हे अतिशय जागृत तीर्थक्षेत्र ! कृष्णा नदीने वेढलेल्या या निसर्गरम्य बेटावर श्री दत्तात्रेयांचे पहिले अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांनी १४ वर्षे वास्तव्य केले.

कोल्हापूर येथील अतीप्राचीन श्री एकमुखी दत्त मंदिर !

कोल्हापूर शहरातील एकमुखी दत्त मंदिरातील दत्ताची मूर्ती १८ व्या शतकात बनवलेली असून नृसिंह सरस्वती महाराज, गाणगापूर; श्रीपाद वल्लभ महाराज आणि नंतर स्वामी समर्थ यांनी या मूर्तीची पूजा केली आहे.