सनातन संस्थेच्या वतीने देशभरात १५३ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात साजरा !

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात १५३ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यामध्ये देहली, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांचा समावेश आहे.

गुरूंविषयी श्रद्धा, भक्तीभाव निर्माण करा ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सनातन संस्थेच्या वतीने १० जुलै या दिवशी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ‘ऑनलाईन’ विशेष सत्संग आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी पू. रमानंद गौडा यांनी गुरु-शिष्य परंपरेविषयी मार्गदर्शन केले. या सत्संगाचा लाभ ३ सहस्रांहून अधिक जणांनी घेतला.

मुलुंड (मुंबई) येथे सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमा स्थळाच्या प्रवेशद्वाराजवळ साधक बसलेल्या रिक्शावर झाड कोसळूनही साधक आणि रिक्शाचालक सुखरूप !

गुरुपौर्णिमेच्या दिवशी कार्यरत असणार्‍या गुरुतत्त्वानेच सनातनच्या साधकांचे रक्षण केल्याचे दर्शवणारी घटना!

साधकांनो, प्रत्येक सेवा समर्पितभावाने करून गुरुपौर्णिमेनिमित्त सेवारूपी गुरुपूजन करा !

‘आपल्या जीवनात कितीही मोठे संकट आले, तरीही त्या प्रसंगात गुरुदेवांवर श्रद्धा ठेवल्याने त्या संकटांवर सहजतेने मात करता येते’, याची सहस्रो साधकांनी प्रचीती घेतली आहे.

गुरुपौर्णिमेनिमित्त सप्तर्षी यांचा संदेश

पोहायला येत नसलेला मनुष्य समुद्रात बुडू लागल्यावर त्याने त्याला साहाय्य मिळेपर्यंत पाण्यात थोडे तरी हात-पाय मारायला हवेत, म्हणजे क्रियमाण वापरायला हवे.

पशू-पक्षी सहजतेने सद्गुरूंकडे आकर्षित होणे, हे त्यांच्यातील चैतन्याचे द्योतक !

आपण पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या आश्रमात पशू-पक्षी निर्भयतेने वावरत असल्याचे वाचलेले आहे. ऋषिमुनींच्या तपस्येची सात्त्विकता पशू-पक्ष्यांनाही जाणवत असे. निसर्गही त्या सात्त्विकतेला प्रतिसाद देऊन ऋषिमुनींच्या आश्रमात बहरत असे.

सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमा महोत्सवाला उपस्थित रहाण्याचे मुख्यमंत्री श्री. बसवराज बोम्माई यांना निमंत्रण !

सनातन संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवाला उपस्थित रहाण्याचे निमंत्रण कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री. बसवराज बोम्माई यांना देण्यात आले. सनातन संस्थेच्या सौ. वनजा यांनी मुख्यमंत्री श्री. बसवराज बोम्माई यांची भेट घेऊन त्यांना हे निमंत्रण दिले.

गुरुपौर्णिमा महोत्सवाला प्रत्यक्ष उपस्थित रहाण्यासाठी अवश्य वाचा

गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस ! बुधवार, आषाढ पौर्णिमा, कलियुग वर्ष ५१२४ (१३ जुलै २०२२) गुरुपौर्णिमा महोत्सवाला प्रत्यक्ष उपस्थित रहाण्याचे लाभ १. सत् विचारांचे सत्त्वगुणी लोक एकत्र आल्याने तेथील सात्त्विकता आणि चैतन्य वाढलेले असते. या वातावरणात गेल्याने त्याचा लाभ आपल्याला आध्यात्मिक लाभ मिळतो. २. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्त्व १ सहस्र पटींनी अधिक कार्यरत असते, … Read more

(निवृत्त) एअर मार्शल सतीश इनामदार यांची सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमास भेट !

सनातन संस्थेचा आश्रम, साधकांची सेवा करण्याची तळमळ, आश्रमातील शिस्त हे सर्व पाहून ते भारावून गेले. त्यांनी स्वत:चा अमूल्य वेळ देऊन सर्व माहिती अत्यंत जिज्ञासेने जाणून घेतली. या वेळी पू. शिवाजी वटकर यांनी इनामदार यांना हिंदु धर्मासंबंधी ग्रंथ भेट दिले.

सर्वश्रेष्ठ नवविधा भक्ती !

भक्ती ही कृती नसून २४ घंटे असणारी वृत्ती आहे. नवविधा भक्ती आपल्याला ईश्वरापर्यंत घेऊन जाते. आत्मनिवेदन ही नवविधा भक्तीची सर्वोच्च पायरी आहे.