श्रद्धा आणि संत वचनावरील दृढ विश्वास यांमुळे भगवंताचे दर्शन होणे
किरातला ‘भगवंत काय असतो ?’, हेही ठाऊक नव्हते; परंतु तो संतांना प्रतिदिन नमस्कार करायचा. संतांना नमस्कार करणे आणि संतदर्शन यांचे फळ आहे की, त्याला ३ दिवसांत भगवंताचे दर्शन झाले.
किरातला ‘भगवंत काय असतो ?’, हेही ठाऊक नव्हते; परंतु तो संतांना प्रतिदिन नमस्कार करायचा. संतांना नमस्कार करणे आणि संतदर्शन यांचे फळ आहे की, त्याला ३ दिवसांत भगवंताचे दर्शन झाले.
आत्मनिवेदनाला साधनेत विशेष महत्त्व आहे; कारण याच माध्यमातून आपण अद्वैताचीही अनुभूती घेऊ शकतो.
‘भाव म्हणजे अध्यात्मातील ‘अ’. तो निर्माण होईपर्यंत साधकाची साधना मानसिक स्तरावरची असते आणि निर्माण झाल्यावर आध्यात्मिक स्तरावर चालू होते.’
‘भाव’, म्हणजे दे
‘साधकाने लक्षात ठेवले पाहिजे की, आपण साधनेत कितीही पुढे गेलो, तरी आपल्याला मधून मधून भावस्थितीत रहाता आले पाहिजे. आपल्या मनात भाव असेल, तरच आपल्याला ईश्वराचा कृपाशीर्वाद मिळणार आहे.
‘ईश्वराच्या सृष्टीत एक दाणा पेरला, तर त्याचे सहस्रो दाणे मिळतील. जगातील कोणती बँक किंवा ऋणको एवढे व्याज देते ? म्हणून एवढे व्याज देणा-या ईश्वराला थोडे तरी स्मरा. एवढी तरी कृतज्ञता असू द्या.’
‘मला काही कौटुंबिक अडचणी आल्यावर ‘तुला व्यवस्थित संसार करता आला नाही’, असे काही जण तोंडावर, तर काही जण पाठीमागे मला बोलत असत. त्या वेळी मला वाईट वाटत असे.
भावनिर्मितीसाठी घेतल्या जाणा-या अशा प्रयोगांमुळे साधक अंतर्मुख होतो, तसेच देवाचे अस्तित्व अनुभवून तात्पुरत्या कालावधीकरता का असेना, भावस्थितीची अनुभूती घेतो. साधकाच्या अंतर्मनातील विचार प्रतिक्रिया, तसेच स्वभावदोष आणि अहं यांसंबंधीचे विचार बाहेर पडू लागतात.
स्वत:मध्ये भाव निर्माण होणे हे ईश्वरप्राप्तीची तळमळ, अंतःकरणात ईश्वराबद्दल निर्माण झालेले केंद्र, प्रत्यक्ष साधना या घटकावर अवलंबून असते. कृती बदलली की, विचार बदलतात आणि विचार बदलले की, कृती बदलते. या तत्त्वानुसार मन अन् बुद्धी या स्तरावर सतत कृती करत राहिल्यास भाव लवकर निमार्र्ण होण्यास साहाय्य होते.
भाव हा असा आहे की, तो देवाकडे आणि त्याच्या गुणांकडे क्षणात घेऊन जातो. भावाचे प्रयत्न हे आपल्याकडून देवच करवून घेतो आणि तसा भाव देवच प्रत्येकात निर्माण करतो.