गुढी : महत्त्व आणि गुढीसाठी प्रार्थना !

सण आणि उत्सव यांमागील गूढार्थ अन् शास्त्र कळले, तर ते अधिक श्रद्धेने साजरे करता येतात; म्हणून या लेखमालेत गूढार्थ आणि शास्त्र देण्यावर विशेष भर दिला आहे. हिंदु नववर्ष अर्थात गुढीपाडव्याला गुढी का उभारावी, युद्ध आणि गुढी यांचा संबंध अन् गुढीपाडव्याच्या दिवशी कोणती प्रार्थना करावी, ते या लेखात देत आहोत.

 

१. प्रजापती लहरींचा सर्वांत जास्त लाभ घेणे शक्य होणे

गुढी लावल्याने वातावरणातील प्रजापति संयुक्‍त लहरी या कलशरूपी सूत्राच्या साहाय्याने घरात प्रवेश करतात. (दूरदर्शनचा अँटेना जसे कार्य करतो, तसे हे आहे.) दुसर्‍या दिवसापासून या कलशात पाणी पिण्यासाठी घ्यावे, म्हणजे प्रजापति लहरींचा संस्कार झालेला कलश त्याच तर्‍हेचे संस्कार पिण्याच्या पाण्यावर करतो, त्यामुळे वर्षभर प्रजापति लहरी आपल्याला प्राप्त होतात. प्रजापति लहरींमध्ये प्रजापति लहरींचे ८० टक्के इतके प्रमाण असते, तर सूर्य, यम आणि संयुक्‍त या लहरींचे प्रमाण अनुक्रमे १०, ८ अन् २ टक्के इतके असते. संपूर्ण वर्षभरात इतर कोणत्याही काळात या लहरींचे प्रमाण इतके नसते. प्रजापति लहरींमुळे वनस्पती अंकुरण्याची जमिनीची क्षमता वाढणे, बुद्धी प्रगल्भ होणे, विहिरींना नवीन पाझर फुटणे इत्यादी परिणाम होतात.

 

२. ब्रह्मदेवाकडून सत्त्वगुण, चैतन्य, ज्ञानलहरी
आणि सगुण-निर्गुण ब्रह्मतत्त्व यांचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त
प्रमाणावर प्रक्षेपण होणे अन् ते ग्रहण करण्यासाठी गुढी उभी केली जाणे

इतर दिवसांच्या तुलनेत गुढीपाडव्याला ब्रह्मदेवाकडून सत्त्वगुण, चैतन्य, ज्ञानलहरी आणि सगुण-निर्गुण ब्रह्मतत्त्व यांचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणावर प्रक्षेपण होत असते. हे प्रक्षेपण ग्रहण करण्यासाठी गुढीपाडव्याला दारापुढे गुढी उभी केली जाते. गुढी लावल्याने तिच्या माध्यमातून सत्त्वगुण, चैतन्य, ज्ञानलहरी आणि सगुण-निर्गुण ब्रह्मतत्त्व घरात सहजपणे प्रवेश करू शकतात. ब्रह्मतत्त्वाने गुढीमध्ये प्रवेश केल्यावर गुढीला लावलेल्या फुलांच्या माळा, साखरेची माळ, तांब्याचा कलश आणि आंब्याची पाने यांमध्ये हे तत्त्व आकृष्ट होते आणि त्या वस्तू ब्रह्मतत्त्वाने संपृक्‍त होतात. यातील ग्रहण करण्यायोग्य वस्तू ग्रहण केल्यास अथवा वास्तूत ठेवल्यास त्यांचा लाभ जीवाला होतो आणि त्याच्या पेशीपेशीत ब्रह्मतत्त्व जाणे सोपे होते. दिवसभर (सूर्यास्तापर्यंत) दारापुढे गुढी उभी केल्यामुळे सत्त्वगुण, चैतन्य, ज्ञानलहरी आणि सगुण-निर्गुण ब्रह्मतत्त्व दिवसभर घरात येत रहातात आणि साठवले जातात. याचा लाभ वास्तूत रहाणार्‍या आणि वास्तूत येणार्‍या जीवांना वर्षभर होतो. जीवाला ब्रह्मतत्त्वाकडून होणार्‍या सूक्ष्म-प्रक्षेपणाचा फायदा वर्षभर होण्यासाठी त्याच्यात किमान ४० टक्के भाव असणे अपेक्षित आहे. जीवात जेवढा भाव अधिक, तेवढा त्याला प्रत्येक सणाचा आणि ईश्‍वराकडून वेळोवेळी प्रक्षेपित होणार्‍या ज्ञानलहरी, शक्‍ति, चैतन्यलहरी, सत्त्वलहरी आणि विशिष्ट देवतेच्या तत्त्वलहरी यांचा पुरेपूर लाभ घेता येतो.

– ईश्‍वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, ९.३.२००५, सकाळी १०.३० ते दुपारी १२.०१)

 

३. युद्ध आणि गुढी यांचा संबंध

अ. युद्धाच्या प्रत्येक स्तरावर गुढी उभी करण्याचे कारण

गुढी ही विजयदर्शक असते. भगवंतांच्या षड्गुणांपैकी ‘यश’ या गुणामुळे देवासुर युद्धात देवतांचा आधीच आणि प्रत्येक स्तरावर विजय झालेला आहे, हे दर्शवण्यासाठी युद्धाच्या प्रत्येक स्तरावर गुढी उभी केली जाते.

आ. युद्धात गुढीचा वापर केल्याने उच्च देवतांचा तत्त्वरूपी आशीर्वाद प्राप्त होणे

अशा प्रकारे गुढीला लावलेल्या वस्त्राप्रमाणे त्यातून आवश्यकतेनुसार शक्‍ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांच्या लहरी प्रक्षेपित होऊन सर्वांना लाभ होतो. उच्च लोकांतून ब्रह्मांडात प्रक्षेपित होणार्‍या सूक्ष्मतम स्तरावरील लहरी गुढी लावल्याने तिच्यात आकृष्ट होऊन त्याचा देवसैनिकांना लाभ होतो. गुढी लावल्याने तिच्यातून मिळणार्‍या चैतन्याच्या बळावर देवसैनिक महा-असुरांशीही निर्भयपणे युद्ध करून विजयी होतात. अशा प्रकारे ब्रह्मदेव, महादेव आणि श्रीविष्णू यांच्या देवतांना लाभणार्‍या आशीर्वादात्मक तत्त्वलहरींमुळे उच्च देवतांचा युद्धात अप्रत्यक्ष सहभाग असतो.

 

४. गुढीपाडव्याच्या दिवशी करावयाची प्रार्थना

गुढीला प्रार्थना करतांना
गुढीला प्रार्थना करतांना

‘हे ईश्‍वरा, आज तुझ्याकडून येणारे शुभाशीर्वाद आणि ब्रह्मांडातून येणार्‍या सात्त्विक लहरी मला जास्तीतजास्त ग्रहण करता येऊ देत. या लहरी ग्रहण करण्याची माझी कुवत नाही. मी तुला संपूर्ण शरण आलो आहे. तूच मला या सात्त्विक लहरी ग्रहण करायला शिकव’, हीच तुझ्याचरणी प्रार्थना ! – ईश्‍वर (श्री. माने यांच्या माध्यमातून, १३.३.२००६, रात्री)

 

गुढीला नमस्कार केल्यावर होणारे सूक्ष्मातील लाभ

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’

गुढीपाडवा या लेखमालिकेतील ‘गुढी’ विषयक इतर लेख

१. हल्ली काही जण स्टीलचे किंवा तांब्याचे पेले किंवा मडक्याच्या आकाराचे तत्सम काही गुढीवर ठेवत असल्याचे पहायला मिळते. ‘तांब्याचा कलश गुढीवर उपडा ठेवावा’ असे धर्मशास्त्र का सांगते याविषयीचे अध्यात्मशास्त्रीय विवेचन वाचण्यासाठी ‘गुढीवरील तांब्याच्या कलशाचे महत्त्व !’ यावर क्लिक करा !

२. सण, उत्सव आदींमागील शास्त्र लक्षात घेतल्यास ते श्रद्धापूर्वक साजरे केले जाऊन त्यायोगे जीवन कल्याणमय होते. या दृष्टीने वर्षातील पहिला सण आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचे नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व जाणून घेण्यासाठी तसेच गुढीचे पूजन शास्त्रानुसार कसे करावे याविषयीचा लघुपट पाहण्यासाठी ‘गुढीपाडवा अर्थात हिंदूंच्या नववर्षदिनाचे महत्त्व !’ यावर क्लिक करा ! यावर क्लिक करा !

Leave a Comment