दत्त जयंती निमित्त सातारा, वाई, कराड, कोरेगाव येथे सनातन संस्थेचे ग्रंथ प्रदर्शनाच्या माध्यमातून अध्यात्म प्रसार !
१. श्री दत्त मंदिर, पळशी, कोरेगाव, सातारा कार्यवाहक श्री पिसाळ महाराज
२. कोरेगाव येथे आमदार श्री. महेश शिंदे यांच्या धर्मपत्नी सौ. प्रिया महेश शिंदे यांची प्रदर्शनाला भेट
कोचि, केरळ येथील आंतरराष्ट्रीय पुस्तकोत्सव मध्ये सनातन संस्था सहभागी
कोचि, केरळ येथील कुरुक्षेत्र पब्लिकेशन यांनी आयोजित केलेला ‘आंतरराष्ट्रीय पुस्तकोत्सव’ डिसेंबर १० ला संपन्न झाला. दहा दिवसांच्या या पुस्तकोत्सवामध्ये सनातन संस्था देखील सहभागी होऊन, संस्थेने त्यात आपले ग्रंथ प्रदर्शन लावले होते.
वैद्यांनी समाजाचे आरोग्य उत्तम कसे राहील ? यासाठी प्रयत्न करणे आवश्यक ! – वैद्य संजय गांधी, सनातन संस्था
मलकापूर वैद्यकीय संघटनेच्या वतीने ‘श्री धन्वन्तरि जयंती सोहळा’
कराड येथे सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे भव्य प्रदर्शन !
सनातन संस्थेच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचा भव्य प्रदर्शन कक्ष येथील श्री दैत्यनिवारणी मंदिरात उभारण्यात आला आहे.
मध्यप्रदेशातील डॉ. विष्णु जोबनपुत्र यांची सपत्नीक रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
मध्यप्रदेशमधील विदिशा जिल्ह्यातील आनंदपूर येथील ‘श्री सद़्गुरु सेवा संघ ट्रस्ट’चे विश्वस्त आणि सद़्गुरु संकल्प नेत्र चिकित्सालयाचे संचालक डॉ. विष्णु जोबनपुत्र अन् त्यांच्या पत्नी सौ. भारती जोबनपुत्र यांनी सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.
सात्त्विक उत्पादनांच्या संदर्भातील सेवांसाठी साधकांची तातडीने आवश्यकता !
देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात सात्त्विक उत्पादनांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर सेवा उपलब्ध आहेत. साबण, उदबत्ती, त्रिफळा चूर्ण, दंतमंजन, उटणे, अत्तर, कापूर, कुंकू, अष्टगंध इत्यादी सात्त्विक उत्पादने बाहेरून बनवून घेतली जातात आणि त्यांची बांधणी (पॅकिंग) देवद आश्रमात केली जाते.
सनातन संस्थेच्या वतीने नवे-पारगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ पार पडले !
आपत्काळात रुग्णाच्या वेदना आणि आजार न्यून करण्यासाठी बिंदूदाबन शिकून घेणे आवश्यक आहे, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने नवे पारगाव येथे ३ दिवसांचे निवासी ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ घेण्यात आले.
सनातन संस्थेच्या वतीने ‘क्राफ्ट पावरकॉन इंडिया लिमिटेड’ कंपनीमध्ये व्याख्यान !
सनातन संस्थेच्या वतीने रांझे गाव, भोर (पुणे) येथील ‘क्राफ्ट पावरकॉन इंडिया लिमिटेड’ या कंपनीमध्ये ‘गणेशोत्सवाचे अध्यात्मशास्त्र आणि साधनेचे महत्त्व’ या विषयावर व्याख्यान घेण्यात आले !
ब्राह्मण संघाच्या वतीने संत पू. (श्रीमती) वैशाली मुंगळे यांचा ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथे सन्मान !
‘ब्राह्मण सभा इस्लामपूर आणि वाळवा तालुका ब्राह्मण संघ’ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच झालेल्या एका समारंभात तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी म्हणून सनातनच्या संत पू. (श्रीमती) वैशाली सुरेश मुंगळे (वय ७६ वर्षे) यांनाही सन्मानित करण्यात आले.
