श्रीराम मंदिरातील सोहळ्याला सनातन संस्थेच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी यांची वंदनीय उपस्थिती !

Article also available in :

लक्ष्मणपुरी येथील विमानतळावर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे राजशिष्टाचारानुसार स्वागत !

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे लखनऊ येथील विमानतळावर आगमन झाल्यावर श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे पदाधिकारी तथा उत्तर प्रदेश शासनाच्या राजशिष्टाचार विभागाचे अधिकारी यांच्या वतीने त्यांचे स्वागत आणि सन्मान करण्यात आले.

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्या लक्ष्मणपुरी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोचल्या असता उत्तरप्रदेश सरकारचे जनसंपर्क अधिकारी आणि ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’चे प्रतिनिधी यांनी त्यांचे स्वागत करून यथोचित सन्मान केला.

सनातन संस्थेच्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी अयोध्येतील श्री कालेराम मंदिरात घेतले भावपूर्ण दर्शन !

अयोध्या येथील कालेराममंदिरातील श्रीराम, सीता, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्या मूर्ती

अयोध्या (उत्तरप्रदेश) – श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने अयोध्या येथे गेलेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी २१ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्येतील श्री कालेराम मंदिरात जाऊन श्रीराम पंचायतनाचे दर्शन घेतले. या वेळी त्यांनी तमिळनाडूतील श्री चिदंबरम् मंदिरातून दिलेले वाळ्याचे ३ हार श्रीरामाला अर्पण केले अन् हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रार्थना केली.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी आणलेले ३ हार श्री कालेराम मंदिरातील पुजार्‍यांना दिले. या वेळी मंदिरातील पुजार्‍यांनी ‘हे तीनही हार चैतन्यमय असून ते उद्या (२२ जानेवारीला) श्रीरामाला अर्पण करतो’, असे सांगितले. या वेळी ते पुजारी म्हणाले, ‘‘राम हा शिवाचा आणि शिव रामाचा जप करतो.’’ श्री कालेराम मंदिर हे सम्राट विक्रमादित्य यांनी प्राचीन श्रीराममूर्तींची प्राणप्रतिष्ठा करून स्थापन केलेले मंदिर आहे.

तमिळनाडूतील श्री चिदंबरम् मंदिरातून आणलेले वाळ्याचे हार श्री कालेराम मंदिर, अयोध्या येथील पुजार्‍याकडे देतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

अयोध्येतील कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यापूर्वी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या तमिळनाडूमधील श्री चिदंबरम् मंदिरातील श्री नटराजाचे दर्शन घेण्यासाठी गेल्या होत्या. त्या वेळी श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी तेथील पुजार्‍यांना त्या अयोध्या येथे श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी जाणार असल्याचे सांगितले. ते ऐकून तेथील पुजार्‍यांनी नटराजाच्या गळ्यातील वाळ्याचे ३ हार काढून श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडे सुपुर्द केले.

रामलला पुन्हा राम मंदिरात प्रतिष्ठापित होणे, ही रामराज्याची नांदीच ! – श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था

अयोध्या – ‘श्रीरामजन्मभूमीसाठी ५०० वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर रामजन्मभूमी मुक्त झाली आणि आज साक्षात प्रभू श्रीरामचंद्रांच्या भव्य राम मंदिराची निर्मिती होऊन रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळा आम्ही आज पहात आहोत, हा सनातन हिंदु धर्मीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. देशभरातील सर्व संत-महंतांना मान देऊन आणि त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा होत आहे. रामलला पुन्हा राम मंदिरात प्रतिष्ठापित होणे, ही रामराज्याची नांदी आहे’, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी या वेळी केले.

अयोध्या येथे श्री शरयू नदीला भावपूर्ण वंदन करतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

ऐतिहासिक आणि अभूतपूर्व अशा अयोध्येतील श्रीराम मंदिरातील मूर्तीच्या भव्य दिव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती लाभली. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस श्री. चंपत राय यांनी सनातन संस्थेच्या दोन्ही आध्यात्मिक उत्तराधिकारी यांना सन्मानपूर्वक आमंत्रित केले होते.

‘आसेतुहिमालयापासून हिंदसागरापर्यंत प्रत्येकाला एकात्मतेच्या बंधनात बांधणारे श्रीराम हे एक अलौकिक राष्ट्रसूत्र आहे ! प्रत्येकाच्या मनातील श्रीरामाच्या मंदिराची उभारणी हे न केवळ अधर्मावर धर्माचा विजय; परंतु त्याचसमवेत कलियुगांतर्गत सत्ययुगाच्या नवनिर्मितीची, हिंदूंच्या अलौकिक ‘हिंदु राष्ट्र निर्मिती’ची, म्हणजेच स्वधर्माधिष्ठित स्वराष्ट्र, सर्वशक्तीसंपन्न, सुव्यवस्थाप्रधान, सर्वसुविधांयुक्त, सुखी, समृद्ध, सुसंस्कृत सुराज्याच्या सूर्योदयाची नांदी आहेत, असे प्रतिपादन श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी या प्रसंगी केले.

अयोध्या येथे श्रीरामाच्या मूर्तीप्रतिष्ठापना सोहळ्यात सहभागी होतांना श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

या वेळी दोन्ही उत्तराधिकारींनी श्रीरामाच्या मूर्तीप्रतिष्ठापना सोहळ्यात सहभागी होता आले, याबद्दल श्रीरामाच्या प्रती कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त केली. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे लखनऊ येथील विमानतळावर आगमन झाल्यावर श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे पदाधिकारी तथा उत्तर प्रदेश शासनाच्या राजशिष्टाचार विभागाचे अधिकारी यांच्या वतीने त्यांचे स्वागत आणि सन्मान करण्यात आले.

– श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था,

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी श्रीरामजन्मभूमीचा खटला जिल्हा न्यायालयापासून सर्वाेच्च न्यायालयापर्यंत लढणारे पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांची २१ जानेवारी २०२४ या दिवशी सदिच्छा भेट घेतली.

 

Leave a Comment