कोचि (केरळ) येथे सनातन संस्थेच्या वतीने दत्त जयंती निमित्त प्रवचन पार पडले !

कोचि (केरळ) – येथील दत्त मंदिरात २६ डिसेंबर या दत्त जयंतीच्या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन घेण्यात आले. याचा लाभ अनेक जिज्ञासू आणि दत्तभक्त यांनी घेतला. सनातन संस्थेच्या साधिका कु. प्रणिता सुखटणकर यांनी ‘भगवान दत्त’ या विषयावर उपस्थितांना दत्त जयंतीचे महत्त्व आणि दत्त जपाचे लाभ यांविषयी शास्त्रोक्त माहिती सांगितली. यासह उपस्थित भाविकांकडून १० मिनिटे ‘श्री गुरुदेव दत्त’ हा सामूहिक नामजप करवून घेण्यात आला. या वेळी दत्त मंदिराकडून कु. सुखटणकर हिचा सत्कार करण्यात आला.

 

Leave a Comment