कोचि (केरळ) येथे सनातन संस्थेच्या वतीने दत्त जयंती निमित्त प्रवचन पार पडले !

कोचि (केरळ) – येथील दत्त मंदिरात २६ डिसेंबर या दत्त जयंतीच्या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन घेण्यात आले. याचा लाभ अनेक जिज्ञासू आणि दत्तभक्त यांनी घेतला.

दत्त जयंती निमित्त केलेल्या प्रसारात धर्मशिक्षणवर्गातील कृतीशील धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग !

दत्त जयंती निमित्त पुणे जिल्ह्यात धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींच्या माध्यमातून ‘दत्त जयंतीचे आध्यात्मिक महत्त्व’ या विषयावर ऑनलाईन प्रवचन घेण्यात आले. प्रवचनांच्या प्रसारसेवेत धर्मशिक्षणवर्गात नियमित येणारे भोर, नाशिक रस्ता आणि माळवाडी येथील धर्मप्रेमी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

दत्त जयंती निमित्त सनातन संस्थेच्या वतीने ठाणे जिल्ह्यात अध्यात्मप्रसार !

दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच दत्त उपासनेचे शास्त्र जिज्ञासूंना कळावे, यासाठी ‘ऑनलाईन’ व्याख्याने, सामूहिक नामजप, फलकप्रसिद्धी, सोशल मिडीया आदी माध्यमांतून ठाणे जिल्ह्यात लोकांचे प्रबोधन करण्यात आले

सनातन संस्था आयोजित सामूहिक नामजप कार्यक्रमाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सनातन संस्था वतीने नुकताच दत्त जयंती निमित्त ‘ऑनलाईन’ स्वरूपात आयोजित केलेल्या सामूहिक नामजप कार्यक्रमाला समाजाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

दत्त जयंती निमित्त ‘ऑनलाईन’ सत्संग आणि सामूहिक नामजप यांचे आयोजन

दत्त जयंती निमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने नुकतेच एका ‘ऑनलाईन’ सत्संगाचे आयोजन करण्यात आले. या वेळी सनातनच्या साधिका कु. पूनम चौधरी आणि सौ. राजरानी माहुर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कु. चौधरी यांनी श्री दत्त यांनी केलेल्या २४ गुण गुरूंविषयी माहिती दिली.