बाबरच्या आक्रमणापासून वाचवलेली श्रीरामाची मूळ मूर्ती स्थानापन्न असलेले अयोध्येतील प्राचीन श्री काळेराम मंदिर !

अखंड शाळीग्राम शिळेत बनवण्यात आलेल्या ५ मूर्ती हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. यामध्ये मध्यभागी श्रीराम, डावीकडे सीतामाता, उजवीकडे लक्ष्मण, तर एका बाजूला भरत आणि दुसर्‍या बाजूला शत्रुघ्न यांच्या मूर्ती आहेत. या मूर्ती पाहूनच भाविकांचा भाव जागृत होतो.

श्रीराम मंदिरातील सोहळ्याला सनातन संस्थेच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी यांची वंदनीय उपस्थिती !

अयोध्येतील श्रीराम मंदिरातील मूर्तीच्या भव्य दिव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त सनातन संस्थेकडून देशभरात चालवण्यात येत असलेले ‘श्रीरामनाम संकीर्तन अभियान’ !

सातारा, वाई, संभाजीनगर, कोरेगाव येथे सनातन संस्थेकडून ‘श्रीरामनाम संकीर्तन अभियान’ !

चला, रामराज्याच्या दिशेने वाटचाल करूया !

श्रीरामजन्मभूमीवर 490 वर्षांच्या वनवासानंतर भव्य श्रीराममंदिर उभे रहात आहे. संपूर्ण देशातच नव्हे, तर जगभरातील हिंदूंमध्ये उत्साहाचा संचार झाला आहे. अमेरिकेमध्ये हिंदूंकडून श्रीराममंदिरानिमित्त फेर्‍या काढण्यात येत आहेत. संपूर्ण भारत राममय झाला आहे. 22 जानेवारी जशी जवळ येत आहे, तशी भारतियांमध्ये रामभक्तीची ज्योत अधिक तेजस्वीपणे तेवू लागत आहे

श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त सनातन संस्थेकडून ‘श्रीरामनाम संकीर्तन अभियान’ !

सनातन संस्थेकडून देशभरात ‘श्रीरामनाम संकीर्तन अभियाना’द्वारे ठिकठिकाणी श्रीरामनाम जप, श्रीरामाकडे रामराज्यासाठी प्रार्थना, तसेच श्रीरामांचा गुणगौरव करण्यात येणार आहे.