कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य पूज्यश्री शंकर विजयेंद्र सरस्वती स्वामी यांचे सनातन संस्थेच्या साधकांनी घेतले आशीर्वाद !

कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य पूज्यश्री शंकर विजयेंद्र सरस्वती स्वामीजी यांचा सध्या सोलापूर येथे निवास आहे. पद्मनगर, अक्कलकोट रोड, सोलापूर येथे दि. २ फेब्रुवारी २०२४ या दिवशी शंकराचार्य स्वामीजी यांचे सनातन संस्थेच्या साधकांनी दर्शन घेतले. त्यांनी सनातन बद्दल सकारात्मक आणि आपुलकीने विचारपूस केली. त्यांच्या मठात बाेलवले. त्यांच्या स्थानिक भक्तांना साधकांच्या संपर्कात रहाण्यास सांगितले.

उजवीकडे जगद्गुरु शंकराचार्य पूज्यश्री शंकर विजयेंद्र सरस्वती स्वामीजी, डावीकडून पाहिले सनातन संस्थेचे श्री. हिरालाल तिवारी (पिवळा शर्ट)

Leave a Comment