ऑनलाईन ‘नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ला प्रारंभ

‘ऑनलाईन’ पद्धतीने चालू झालेल्या ‘नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे उद्घाटन सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

म्हापसा (गोवा) येथील प.पू. सुशीला आपटेआजी (वय ८३ वर्षे) यांचा खडतर जीवनप्रवास आणि गुरुकृपेने त्या माध्यमातून त्यांची झालेली कठोर साधना !

‘गुरूंपुढे आपण काय आहोत ? त्यांनी जे सांगितले, ते केवळ ऐकायचे आणि तसे वागायचे. ही सर्व गुरूंचीच लीला असते. ते सर्वज्ञ आहेत. देणारेही तेच आणि घेणारेही तेच !’, असे विचार त्या वेळी प.पू. आजींच्या मनात आले.

धर्मरक्षण करण्यासाठी साधना आणि धर्माचरण करणे आवश्यक ! – सद्गुरु सत्यवान कदम, धर्मप्रसारक, सनातन संस्था

‘लोकमान्य टिळक यांच्या जयंती’चे औचित्य साधून २३ जुलै या दिवशी सावंतवाडी येथील युवा धर्मप्रेमींसाठी ‘शौर्यजागृती’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

सनातन संस्थेच्या वतीने ‘ऑनलाईन’ प्रथमोपचार शिबिर उत्साहात पार पडले

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आपत्काळात उपयोगी असणारे प्रथमोपचार शिबिर जळगाव, धुळे, नंदुरबार, नांदेड, परभणी, नगर अन् नाशिक येथील जिज्ञासूंसाठी ‘ऑनलाईन’ पार पडले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील विविध प्रकारचे साहित्य ठेवण्यासाठी फोंडा (गोवा) येथील परिसरात ५० ते २०० चौ. मीटर वास्तूची आवश्यकता !

रामनाथी (गोवा) आश्रमातील वाढत्या कार्याचा आवाका पहाता विविध प्रकारचे साहित्य, उदा. धान्य, फर्निचर, बांधकाम आणि देखभाल-दुरुस्तीची सामुग्री इत्यादी ठेवण्यासाठी तेथील जागा अपुरी पडत आहे.

बेळगाव येथील सनातन संस्थेचे संत पू. (डॉ.) नीलकंठ अमृत दीक्षित (वय ९२ वर्षे) यांचा देहत्याग !

सनातन संस्थेचे ८७ वे संत पू. (डॉ.) नीलकंठ अमृत दीक्षित (वय ९२ वर्षे) यांनी २७ जुलैला रात्री ९.३५ वाजता येथील त्यांच्या रहात्या घरी देहत्याग केला.

घटनेतील ‘सेक्युलर’ शब्द हटवून भारताला घटनात्मकरित्या हिंदु राष्ट्र घोषित करा ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

३० जुलै ते २ ऑगस्ट आणि ६ ते ९ ऑगस्ट या कालावधीत प्रतिदिन सायंकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत ‘ऑनलाईन अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ होणार असून ते सर्वांसाठी खुले असेल.

पू. भगवंतकुमार मेनराय यांनी श्वासासह नामजप जोडता यावा, यासाठी केलेले मार्गदर्शन

साधकांनी हे लक्षात ठेवावे की, त्यांना नामजप श्वासाशी जोडायचा आहे आणि श्वास नामजपाशी जोडायचा नाही, म्हणजे नामजपाच्या लयीत श्वासोच्छ्वास करायचा नाही, तर श्वासाच्या लयीत नामजप करायचा आहे.

३० जुलैपासून ‘ऑनलाईन नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’

या वर्षी कोरोना महामारीमुळे प्रत्यक्ष अधिवेशन घेण्यास मर्यादा असल्यानेे यंदाचे ‘नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ ‘ऑनलाईन’ पद्धतीने होणार आहे.

‘स्वतःच्या चल आणि अचल संपत्तीचे ‘सत्पात्रे दान’ व्हावे’, या हेतूने ती सनातन संस्थेला दान करण्यास इच्छुक असल्यास आपल्या हयातीत अर्पण करा !

सनातन संस्थेचे कार्य पाहून समाजातील अनेक जण संस्थेला विविध स्वरूपांत अर्पण देतात. बरेच जण स्वतःची चल (धन, सोने, वाहने इत्यादी) आणि अचल (घर, ‘फार्म हाऊस’, दुकान, मोकळी जागा (प्लॉट), शेतभूमी आदी) संपत्ती सनातन संस्थेला देण्याची इच्छा व्यक्त करतात.