सनातन संस्थेच्या वतीने ‘ऑनलाईन’ प्रथमोपचार शिबिर उत्साहात पार पडले

संभाजीनगर – सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आपत्काळात उपयोगी असणारे प्रथमोपचार शिबिर जळगाव, धुळे, नंदुरबार, नांदेड, परभणी, नगर अन् नाशिक येथील जिज्ञासूंसाठी ‘ऑनलाईन’ पार पडले. यामध्ये ६०० जिज्ञासू सहभागी झाले होते. हिंदु जनजागृती समितीचे नांदेड येथील श्री. वैभव आफळे यांनी शिबिराचा उद्देश सांगितला. सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी ‘येणार्‍या आपत्काळात प्रत्येकाने प्रथमोपचार शिकणे का आवश्यक आहे ?, याविषयी सांगितले. तसेच विविध समस्यांवर साधना करणे किती आवश्यक आहे ? आणि आपत्तीच्या विविध प्रसंगात स्थिरतेने कसे राहू शकतो’, याविषयी अमूल्य असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रतीक्षा कोरगावकर यांनी केले.

संभाजीनगर येथील श्री. महेश देशपांडे यांनी काळानुसार प्रथमोपचार शिकण्याचे महत्त्व विशद केले. जळगाव येथील सौ. मीनाक्षी पाटील यांनी ‘रुग्णाची नाडी कशी पडताळावी ?’ हे विविध ‘स्लाईड शो’द्वारे समजावून सांगितले. तसेच नाशिकच्या डॉ. (सौ.) राठी यांनी वीज कोसळतांना कोणती काळजी घ्यावी ? याविषयी मार्गदर्शन केले. चोपडा येथील सौ. सुनिता व्यास यांनी प्रथमोपचार शिकल्यामुळे प्रत्यक्ष जीवनात कसे साहाय्य झाले आणि संभाजीनगर येथील सौ. रोहिणी जोशी यांना प्रथमोपचार शिकल्याने कुटुंबामध्ये गंभीर समस्येचा प्रसंग कसा हाताळता आला, हे सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment