रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील विविध प्रकारचे साहित्य ठेवण्यासाठी फोंडा (गोवा) येथील परिसरात ५० ते २०० चौ. मीटर वास्तूची आवश्यकता !

सनातन संस्थेचे राष्ट्ररक्षण, धर्मजागृती आणि अध्यात्मप्रसार, हे कार्य आता देश-विदेशांत सर्वत्र मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहे. ईश्वरी कृपेने अनेक हितचिंतक आणि धर्मप्रेमीसुद्धा पूर्णवेळ साधना अन् धर्मकार्य करण्याची इच्छा दर्शवत आहेत.

रामनाथी (गोवा) आश्रमातील वाढत्या कार्याचा आवाका पहाता विविध प्रकारचे साहित्य, उदा. धान्य, फर्निचर, बांधकाम आणि देखभाल-दुरुस्तीची सामुग्री इत्यादी ठेवण्यासाठी तेथील जागा अपुरी पडत आहे. त्यासाठी फोंडा (गोवा) येथील परिसरात ५० ते २०० चौ. मीटर वास्तू, उदा. गोदाम (गोडाऊन), दुकानाचा गाळा, तळघर, निवारा शेड, घर, घराशेजारील वेगळी खोली हवी आहे. पावसाचे पाणी, तसेच ओल येणे, वाळवी येणे, उंदरांचा उपद्रव आदींपासून ही वास्तू सुरक्षित असावी.

अशा प्रकारची वास्तू संस्थेला अर्पण म्हणून किंवा विनामूल्य वापरण्यासाठी अथवा अल्प भाडे स्वरूपात देऊ शकत असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.

नाव आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१’

 – श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्वस्त, सनातन संस्था. (२६.७.२०२०)

Leave a Comment