धर्मरक्षण करण्यासाठी साधना आणि धर्माचरण करणे आवश्यक ! – सद्गुरु सत्यवान कदम, धर्मप्रसारक, सनातन संस्था

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) येथे ‘शौर्यजागृती’ या विषयावरील
‘ऑनलाईन’ व्याख्यानाच्या माध्यमातून युवा धर्मप्रेमींचे प्रबोधन

सद्गुरु सत्यवान कदम

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) – शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक बळ असेल, तर आपण कठीण प्रसंगाला सामोरे जाऊ शकतो, तसेच त्यामुळे आपल्यात आत्मविश्वास निर्माण होतो. आपण साधना आणि धर्माचरण केले, तरच धर्मरक्षणाचे कार्य प्रभावीपणे करू शकतो, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांनी केले. हिंदु राष्ट्राविषयी जागृती करणे, आपत्काळाच्या दृष्टीने साधना अन् जीवनात स्वरक्षण प्रशिक्षणाचे महत्त्व बिंबवणे, या उद्देशांनी ‘लोकमान्य टिळक यांच्या जयंती’चे औचित्य साधून २३ जुलै या दिवशी सावंतवाडी येथील युवा धर्मप्रेमींसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘शौर्यजागृती’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये ते मार्गदर्शन करत होते. या वेळी समितीचे युवा संघटक सर्वश्री सुमित सागवेकर आणि निरंजन चोडणकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास हिंदु जनजागृती समितीचे श्री. शंकर राऊळ, श्री. जीवन केसरकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. भक्ती पांगम यांनी केले. या ‘ऑनलाईन’ व्याख्यानात ७५ धर्मप्रेमी सहभागी झाले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment