३० जुलैपासून ‘ऑनलाईन नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’

फोंडा (गोवा) – हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने गेली ८ वर्षे रामनाथी, गोवा येथे अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे यशस्वी आयोजन केले जात आहे. या वर्षी कोरोना महामारीमुळे प्रत्यक्ष अधिवेशन घेण्यास मर्यादा असल्यानेे यंदाचे ‘नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ ‘ऑनलाईन’ पद्धतीने होणार आहे. ३० जुलैला सायंकाळी ६.३० वाजता अधिवेशनाचे उद्घाटन होईल. ३० आणि ३१ जुलै, तसेच २, ६ आणि ९ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत ‘फेसबूक’, ‘यू ट्यूब’, ‘ट्विटर’, तसेच समितीचे संकेतस्थळ या माध्यमातून या अधिवेशनाचे प्रसारण करण्यात येणार असून अधिकाधिक जणांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

एकूण ५ दिवस चालणार्‍या या ‘ऑनलाईन’ अधिवेशनामध्ये देशभरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे नेते, तसेच पदाधिकारी सहभागी होणार असून प्रतीवर्षीप्रमाणे हिंदूहिताच्या रक्षणासाठी, तसेच धर्म, राष्ट्र आणि हिंदु समाज यांवर होणारे आघात रोखण्याच्या संदर्भात अधिवेशनामध्ये विचारमंथन करण्यात येणार आहे. अधिवेशनामध्ये हिंदु राष्ट्राच्या दिशेने आगामी उपक्रमांची दिशा निश्‍चित करण्यात येईल. ‘मंदिर संस्कृती रक्षण’, ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि दिशा’ आदी विविध विषयांवर या अधिवेशनामध्ये चर्चा होणार आहे.

‘ऑनलाईन’ अधिवेशनाचा लाभ घेण्यासाठी पुढील माध्यमांना भेट द्या !

Fb.com/HinduAdhiveshan

Youtube.com/HinduJagruti

https://www.hindujagruti.org/

Twitter.com/Hindujagrutiorg

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment