
बेळगाव – सनातन संस्थेचे ८७ वे संत पू. (डॉ.) नीलकंठ अमृत दीक्षित (वय ९२ वर्षे) यांनी २७ जुलैला रात्री ९.३५ वाजता येथील त्यांच्या रहात्या घरी देहत्याग केला. २८ जुलै या दिवशी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात पूर्णवेळ सेवा करणार्या साधिका सौ. अंजली कणगलेकर यांचे वडील, तसेच पूर्णवेळ सेवा करणारे सनातन संस्थेचे साधक डॉ. अंजेश कणगलेकर आणि श्री. सत्यकाम कणगलेकर यांचे आजोबा होते. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुलगे, १ मुलगी, सुना, जावई, नातवंडे आणि पणतू असा परिवार आहे. सनातन परिवार दीक्षित आणि कणगलेकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !