त्रैलोक्याचे योगीराज हे अवतरले भूवरी ।
ज्यांचे पंचमहाभूतांवर नियंत्रण आहे, ज्यांची प्रभा दिव्य आणि तेजस्वी आहे, ज्यांचे दैवी हास्य मनाचा ठाव घेते, ज्यांचा वात्सल्यमय कृपाकटाक्ष साधकांना आश्वस्त करतो, ज्यांच्या केवळ दर्शनानेही अनेक संकटांचे हरण होते, ते श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेव साधकांचा प्राणच आहेत ! अशा श्रीविष्णुरूपातील गुरूंच्या तेजस्वी मुद्रांचे मनोहारी दर्शन डोळे भरून घेऊया !