दिंड्या, पताका वैष्णव नाचती । श्रीमन्नारायणाचा महिमा वर्णावा किती ।।
श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवांचा ‘न भूतो, न भविष्यती’ असा दिव्य रथोत्सव !
श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवांचा ‘न भूतो, न भविष्यती’ असा दिव्य रथोत्सव !
ज्यांचे पंचमहाभूतांवर नियंत्रण आहे, ज्यांची प्रभा दिव्य आणि तेजस्वी आहे, ज्यांचे दैवी हास्य मनाचा ठाव घेते, ज्यांचा वात्सल्यमय कृपाकटाक्ष साधकांना आश्वस्त करतो, ज्यांच्या केवळ दर्शनानेही अनेक संकटांचे हरण होते, ते श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेव साधकांचा प्राणच आहेत ! अशा श्रीविष्णुरूपातील गुरूंच्या तेजस्वी मुद्रांचे मनोहारी दर्शन डोळे भरून घेऊया !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अध्यात्म विद्येला पुन्हा उजळवण्याचे कार्य महनीय ! – प.पू. गोविंददेवगिरि महाराज, कोषाध्यक्ष, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास, अयोध्या
सप्तर्षींच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा रथोत्सव साजरा होण्यापूर्वी ईश्वराने रथोत्सवाच्या संदर्भात कशी लीला घडवली, याविषयी या लेखातून जाणून घेऊया. श्रीकाकुलम्आणि श्री जगन्नाथ पुरी येथील रथोत्सवाचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दिव्य रथोत्सवाशी संबंध असणे, हे ईश्वरी नियोजन !
‘सप्तर्षींच्या आज्ञेप्रमाणे तिथी वैशाख कृष्ण सप्तमी (२२.५.२०२२) या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ८० वा जन्मोत्सव ‘रथोत्सव’ स्वरूपात साजरा करण्यात आला. रथोत्सव पूर्ण झाल्यावर संध्याकाळी सप्तर्षी जीवनाडीपट्टीचे वाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी भ्रमणध्वनीवरून नाडीवाचन केले.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव ही साधकांसाठी आनंदाची अन् भक्तीभावाची पर्वणीच असते ! वैशाख कृष्ण सप्तमी, म्हणजे २२ मे २०२२ या मंगलदिनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ८० वा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
‘आतापर्यंत सप्तर्षी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून सनातन संस्थेसाठी २०० पेक्षा अधिक वेळा नाडीवाचन झाले आहे. याखेरीज कौशिक नाडी, भृगु नाडी, शिवनाडी, वसिष्ठ नाडी, काकभुजंड नाडी आणि अत्रि नाडी अशा अनेक ॠषींनी लिहिलेल्या नाडीपट्ट्यांमध्ये सनातन संस्थेचे तीन गुरु, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे श्रीविष्णूचे अवतार असल्याचे आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या ‘श्रीविष्णूची शक्ती’, म्हणजेच श्री महालक्ष्मीच्या अवतार असल्याचे सांगितले आहे.
साधकांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपणारे परात्पर गुरु डॉक्टरांसारखे दुसरे गुरु आज त्रिलोकांत तरी शोधून सापडतील का ? केवळ अशक्य ! यासाठीच परात्पर गुरु डॉक्टरांविषयी अंतःकरणात पुन:पुन्हा हेच शब्द उमटतात, ‘चालविसी हाती धरोनिया ।’
गुरुदेव हे स्वतः श्रीविष्णूचे अवतार असल्याने त्यांच्या अवतारी कार्याविषयीचे मुहूर्त ठरवणारे आम्ही ॠषि-मुनीच आहोत. आताच्या देवलोकातील अवतारी कार्याच्या ग्रहगतीला धरून देवलोकातील पंचांगाप्रमाणे आम्ही सप्तर्षि वैशाख मासाच्या ऐवजी चैत्र मासात जन्मोत्सवाचा मुहूर्त देत आहोत.’’
हिंदु धर्मातील कोणताही धार्मिक विधी करण्यापूर्वी त्या विधीसाठी यजमानांनी संकल्प करणे आवश्यक असते. संकल्प केल्यामुळे ज्या उद्देशाने तो धार्मिक विधी केला जातो, त्याला दैवी अधिष्ठान प्राप्त होऊन इच्छित फलप्राप्ती होते.