परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतःच्या एका हाताची बोटे पाण्यात बुडवल्यावर त्यात विविध रंगांची निर्मिती होणे आणि त्याचे आध्यात्मिक विश्लेषण !

हाताच्या करंगळीपासून अंगठ्यापर्यंतच्या सर्वच बोटांत पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश ही पंचतत्त्वे असतात. पाण्यात बोटे बुडवणार्‍या व्यक्तीच्या आध्यात्मिक पातळीप्रमाणे रंग निरनिराळा दिसतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांच्या आणि हातांच्या बोटांच्या नखांमध्ये झालेले पालट आणि त्या मागील अध्यात्मशास्त्र !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांच्या आणि हातांच्या बोटांच्या नखांवर उभ्या रेषा अन् नखाच्या मुळापासून वर जाणारी गुलाबी रंगाची अर्धवर्तुळाकार २ – ३ वलये यांचा स्पर्श खडबडीत लागणे आणि या रेषांचा उठावदारपणा वाढणे यांमागील अध्यात्मशास्त्र !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याला नाथ संप्रदायाचे साहाय्य !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य जणू अवतारीच आहे. असे म्हणतात की, अवताराने कार्यासाठी जन्म घेतला की, त्याच्या त्या कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी त्याचे देवतागणही जन्म घेतात. याचीच प्रचीती परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या अवतारी कार्यामध्ये साधकांना येत आहे. त्यांना विविध ईश्वरी स्त्रोतांकडून या कार्यात आपणहून साहाय्य लाभत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्यावरील अरिष्टे टाळण्यासाठी विविध संतांनी केलेले साहाय्य !

‘आपण चालत असू, तर वार्‍याचा विरोध होत नाही; पण धावत असू तर वार्‍याचाही आपल्याला विरोध होतो. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कल्याणकारी कार्याच्या संदर्भातही असेच अनुभव येत आहेत. जेथे राम-कृष्णादी अवतार आणि ज्ञानेश्वर-तुकोबांसारखे संतमहात्मे यांनाही विरोध झाला, तेथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याला विरोध होणे, हे स्वाभाविक आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याला विविध संतांनी केलेले साहाय्य

सनातन धर्माच्या पुनरुत्थानासाठी आणि त्याची अवघ्या विश्वात प्रस्थापना करण्यासाठी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आरंभलेल्या कार्यात ईश्वरी कृपेने अनेक संतांनी बहुमोल वाटा उचलला किंवा त्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना मार्गदर्शन केले. या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, यासाठी हा लेख आहे.

स्वतः भगवंतस्वरूप असूनही आई-वडिलांची कृतज्ञताभावाने, परिपूर्णतेने आणि सहजभावाने सेवा करून समाजापुढे उत्तम सेवेचा आदर्श ठेवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

सेवा करतांना प्रत्येक कृतीला भक्तीमार्गानुसार भावाची आणि कर्मयोगानुसार परिपूर्णतेची जोड दिल्यास निश्‍चितच ती कृती आध्यात्मिक स्तरावर होते; मग ‘ती कृती संतांसाठी केलेली असो किंवा आई-वडिलांसाठी केलेली असो, तिचा आध्यात्मिक लाभ मिळतोच !

७९ व्या वर्षीही त्वचेवर विशेष सुरकुत्या नसणे, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दैवी वैशिष्ट्य !

गेल्या २ वर्षांत परात्पर गुरु डॉक्टरांनी आमच्याकडून त्यांच्या विविध छायाचित्रांचा अभ्यास करवून घेतला. या अभ्यासाच्या माध्यमातून भगवंताने उलगडलेली परात्पर गुरु डॉक्टरांच्या अवतारत्वाच्या संदर्भातील दैवी लीला आम्हाला अनुभवता आली.

साधकांना स्वतःत अडकू न देता तत्त्वनिष्ठ करणारे विश्वव्यापी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि शिष्य म्हणून साधकांनी करावयाचे कर्तव्य !

‘परात्पर गुरुदेवांनी प्रथमपासूनच साधकांना शिकवले आहे, ‘‘संतांच्या देहात अडकू नका; कारण संत हे देहधारी असल्याने त्यांना मृत्यू हा असतोच. संतांचे तत्त्वच महत्त्वाचे आहे.’ तत्त्व हे अविनाशी असल्याने ते आपल्याला चिरकाल मार्गदर्शन करू शकते; परंतु संतांच्या देहाचे तसे नसते. संत जिवित असेपर्यंतच आपल्या वाणीद्वारे साधकांना मार्गदर्शन करत असतात.

पुढे घराघरांत लोक तुला पूजतील’, या प.पू. भक्तराज महाराजांनी (प.पू. बाबांनी) परात्पर गुरु डॉक्टरांना दिलेल्या आशीर्वादाप्रमाणेच महर्षींनीही सांगणे आणि त्याची मिळत असलेली प्रचीती

हिरा कितीही लपवला तरी त्याचा प्रकाश लपत नाही किंवा अल्प होत नाही. चैतन्याच्या ओढीने प्रवास करणार्‍याला परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र पाहून पहिल्याच दृष्टीक्षेपात ‘यात काहीतरी वेगळे आहे’, असे जाणवते आणि तो एका अनामिक अशा आकर्षण शक्तीने त्याकडे ओढला जातो.

संत आणि मान्यवर यांनी जाणलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अवतारत्व !

पूर्वीपासूनच समाजातील संत आणि अध्यात्मातील अधिकारी व्यक्ती यांनी परात्पर गुरु डॉक्टरांची अवतारी वैशिष्ट्ये जाणली होती. सूर्य उगवल्याचे सर्वांना सांगावे लागत नाही, ते आपोआपच कळते, तसेच परात्पर गुरु डॉक्टरांच्या अवतारत्वाची अनुभूती सर्वांना येते !