परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहातून बालपणीही प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याची अनुभूती

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, या उक्तीप्रमाणे अवतारी देहातूनही बालपणीपासूनच चैतन्याचे प्रक्षेपण होत असते. अध्यात्मातील अधिकारी व्यक्तींना, तसेच सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असणार्‍यांना ते चैतन्य जाणवते. येथे परात्पर गुरु डॉ. आठवले २ वर्षांचे असतांनाचे त्यांचे छायाचित्र, त्या छायाचित्रावरून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ६७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कु. प्रियांका लोटलीकर यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण आणि त्या छायाचित्राप्रमाणेच चेन्नई येथील सनातनच्या साधिका ६८ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या सौ. उमा रविचंद्रन् यांनी रेखाटलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांची स्थुलातील वैशिष्ट्ये दर्शवणारे चित्र येथे प्रसिद्ध करत आहोत. त्यावरून साक्षात् विष्णुस्वरूप असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यात बालपणीच कार्यरत असलेल्या अवतारत्वाची अनुभूती घेता येईल.

Leave a Comment