परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वत:तील शिवतत्त्वाची घेतलेली साक्ष म्हणजे त्यांना ऐकू आलेला नाद !

pp_dr

‘नाक आणि तोंड बंद करून उच्छ्वास सोडण्याचा प्रयत्न केला, तर कानांत हवेचा दाब निर्माण होतो. तेव्हा आज प्रथमच कानांत नाद ऐकू आला.’ – प.पू. डॉ. आठवले (१३.८.२०१४)  

त्याचे शास्त्र येथे दिले आहे.

nishad_deshmukh_200
श्री. निषाद देशमुख

१. परात्पर गुरु डॉ. आठवले हे जीवात्मा
अवस्थेत निरीक्षक, तर शिवात्मा अवस्थेत परीक्षक असणे

‘अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी अविरत झटणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मनात ‘समष्टी कल्याणासाठी इतरांना अध्यात्मशास्त्र सांगावे’, अशी अवतारत्वाशी संलग्न तीव्र इच्छा असते. ही इच्छा त्यांना प्रत्येक साधक, वस्तू, घटनाक्रम आणि ज्ञान यांविषयीचे निरीक्षण करण्यासाठी जीवात्मा दशेत, तर ते ज्ञान परिपूर्ण अन् योग्य आहे, याच्या परीक्षणासाठी शिवात्मा दशेत ठेवते.

२. जीवात्मा दशेत प्रश्‍नकर्ता, तर शिवात्मा दशेत परीक्षक असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

स्वत: ब्रह्मानंद स्थितीतील ज्ञानमूर्ती असणारे श्रीविष्णूचे अवतार परात्पर गुरु डॉ. आठवले हे साधकांना मिळणारे ज्ञानाचे स्रोत आहेत. त्यांच्यामुळे चालू असलेल्या ज्ञानयज्ञात ते जीवात्म्याच्या स्वरूपात प्रश्‍नकर्ता, तर शिवात्म्याच्या स्वरूपात परीक्षक असतात.

जीवात्मा दशेत प्रश्‍न निर्माण करून ते साधकांना त्याविषयीचे ज्ञान देऊन साधकांची साधना करवून घेतात, तर शिवात्मा दशेत परीक्षक म्हणून त्या ज्ञानाची शुद्धी करून ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना गुरुकृपा, तर समष्टीला अवतारी कृपा यांची अनुभूती देतात.

३. शिवात्मा दशेत प.पू. डॉक्टर हे स्वतः ज्ञानब्रह्म असल्याने
त्या अवस्थेतून जीवात्मा दशेत येऊन त्यांनी स्वत:चे निरीक्षण
केल्यामुळे त्यांना त्यांच्यातील शिवत्वाची अनुभूती, म्हणजे नाद ऐकू येणे

अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी शिवात्मा दशेतून जीवात्मा दशेत, तर जीवात्मा दशेतून शिवात्मा दशेत, या प्रकारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या स्थितीमध्ये कार्यानुरूप पालट होत असतो. हे पालट क्षणार्धात न होता देहाचे मर्यादाबंध असल्याने काही कालावधी घेणारे असतात.

वरील प्रयोग करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले शिवात्मा दशा सोडून जीवात्मा दशेत येत होते. शिवात्मा दशेत कार्य करण्यासाठी घनीकृत होऊन कार्यरत असलेले ऊर्जेचे कार्य पूर्ण झाल्याने ती ऊर्जा परत निर्गुणात जात होती. परात्पर गुरु स्थूल देहातून करत असलेली कृतीमुळे प्राणमयकोष अधिक प्रमाणात कार्यरत होऊन देहात वायूचे संचारण अधिक प्रमाणात कार्यरत झाले होते. कार्यासाठी प्रकटलेली ऊर्जा देहाच्या आतील पोकळीच्या माध्यमातून निर्गुणात जात असतांना उच्छ्वास सोडतांना कार्यरत होणार्‍या वायूचे सगुण माध्यम मिळाल्याने आणि कानातील पोकळी हे या क्रियेचे स्थान झाल्याने निर्गुण-सगुण या नादाची निर्मिती कानात झाली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची जीवात्मा दशेतील निरीक्षकता या वेळी कार्यरत असल्याने निर्माण झालेले नाद ऐकून त्याचे दैवीत्व त्यांना टिपता आले.

नादामागील मूळ ऊर्जा हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या शिवात्मा दशेची असल्याने या नादाची अनुभूती म्हणजे त्यांनी स्वत:च्या शिवत्वाची अनुभूती जीवात्मा दशेत घेणे.

४. ‘सगुण-निर्गुण भेदाभेद कर्म’ हा सिद्धांत
सिद्ध करणारी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अवतारी कृपा !

परात्पर गुरूंविषयी सांगायचे झाले, तर ‘सगुण-निर्गुण भेदाभेद कर्म हेच खरे वर्म’ असे वर्णन करू शकतो. आजच्या या आपत्काळात सगुण स्तरावर साधकांना आवश्यक मार्गदर्शन करणारे आणि निर्गुण स्तरावर सर्व करवून घेणारे दुसरे, अशी दोन वेगवेगळी तत्त्वे नसून ते एकच परात्पर गुरु डॉ. आठवलेच आहेत. याची साक्ष पूर्ण मानवजातीला व्हावी; म्हणून परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ही अवतारी कृपा घडली. हाच या अनुभूतीचा निष्कर्ष !’

– श्री. निषाद देशमुख, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.१२.२०१६, दुपारी ३.३०)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात