व्यष्टी आणि समष्टी साधना यांचा सुरेख मेळ घालणारे प.पू. पांडे महाराज !
बाबा ग्रंथ लिहित असतांना ‘ग्रंथाचा आध्यात्मिक लाभ अधिकाधिक लोकांना कसा होईल ?’, या दृष्टीने ते विचार करत असत. त्यांना ‘ग्रंथ लवकरात लवकर छापून व्हावा’, ही तळमळ होती. त्यासाठी त्यांनी डीटीपी आणि मुद्रितशोधन करणार्या योग्य व्यक्ती शोधल्या.
