सनातनमधील शिकवणीचा अनुभव घेऊन साधना केल्यास साधक अध्यात्माच्या परम शिखरापर्यंत पोहोचतील ! – सुनील ठाकूर, जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान, नाणीज (जिल्हा रत्नागिरी)

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज येथील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानचे स्वीय्य साहाय्यक श्री. सुनील ठाकूर आणि कार्यकर्ते श्री. राजन बोडेकर यांनी येथील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास नुकतीच भेट दिली.

सनातनचे ग्रंथप्रदर्शन पाहून मला येथून जावेसे वाटत नाही ! – महंत श्री देवनारायणदास वेदांताचार्य महाराज, कानपूर, उत्तरप्रदेश

महंत देवनारायणदास वेदांताचार्य महाराज आणि त्यांच्यासमवेत आलेले महंत श्री वैष्णुदास बिथान (बिहार) यांनी सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास भेट दिली.

सनातनच्या कार्याला माझेही सहकार्य असेल ! – श्री महंत कृष्णदास महाराज, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय श्री पंच दिगंबर अग्नि आखाडा

सनातनचे ग्रंथप्रदर्शन अतिशय चांगले आहे. असे प्रदर्शन लावल्यामुळे अध्यात्मप्रसार होऊन देशात हळूहळू सर्वत्र जागृती होईल.

गोवर्धन पुरी पीठाधिश्‍वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांचा सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने सन्मान !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभमेळ्यात सेक्टर १५ येथे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांचा सन्मान समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते शाल, पुष्पहार, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

शंकराचार्य आणि संत यांच्या त्यागामुळे सनातन धर्माचे अस्तित्व आजही कायम ! – शंकराचार्य स्वामी श्री स्वरूपानंद सरस्वतीजी महाराज

शंकराचार्य आणि संत यांच्या त्यागामुळे सनातन धर्माचे अस्तित्व अजूनही कायम असून ते कायम राहील, असे आशीर्वचन ज्योतिष आणि द्वारकाशारदा पीठाधीश्‍वर शंकराचार्य स्वामी श्री स्वरूपानंद सरस्वतीजी महाराज यांनी प्रयागराज येथे केले.

प्रयाग कुंभपर्वाच्या निमित्ताने ‘सनातन संस्था’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांचा व्यापक धर्मप्रसार !

कुंभक्षेत्र २५ कि.मी. विस्तीर्ण आहे. त्याच्या हृदयस्थानी म्हणजे संगमक्षेत्राजवळील मोरी मार्गाजवळ ‘सनातन संस्थे’ला जागा मिळणे, ही केवळ गुरुकृपा होती.

श्री क्षेत्र आप्पाचीवाडी कुर्ली येथील श्री हालसिद्धनाथ देव आणि श्री बिरदेव यांचे भक्तगणांसह रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात शुभागमन !

ढोलांचे गजर (वालंग), नामघोष, गजी नृत्य, तलवार नाचवणे (बनगर नृत्य) यांमुळे आश्रमातील वातावरण चैतन्यमय झाले होते. सायंकाळी पू. भगवान डोणे महाराज यांचा भाकणुकीचा विशेष कार्यक्रम होता.

गंगास्नानाविषयी संभ्रम निर्माण करणार्‍या हिंदुद्वेष्ट्यांचे षड्यंत्र यशस्वी होऊ देऊ नका ! – सनातन संस्था

समस्त सनातनधर्मी हिंदु समाज कुंभपर्वात गंगास्नान करणे, याला पुण्यकारी मानतो. कुंभमेळ्याच्या निमित्ताने कोट्यवधी भाविक गंगानदीत डुबकी घेऊन त्यांच्या पापांचे क्षालन करतात.

सनातन धर्म, ग्रंथ आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी कायम सतर्क रहावे ! – शंकराचार्य स्वामी श्री स्वरूपानंद सरस्वती महाराज

सनातन धर्म, ग्रंथ आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी कायम सतर्क रहावे.

कुंभमेळ्यातील सनातनच्या ‘धर्मशिक्षण’ आणि ‘राष्ट्र-धर्म रक्षण’ यांसंबंधीच्या फलक प्रदर्शनास जिज्ञासू, साधू, संत-महंत यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सनातन संस्थेने सेक्टर १५, मोरी मार्ग-मुक्ती मार्गाच्या चौकात ‘धर्मशिक्षण तथा राष्ट्र-धर्म रक्षणासंबंधी फलक प्रदर्शना’चे आयोजन केले आहे.