प्रयागराज : गंगा रक्षणाविषयी जागृती व्हावी, या उद्देशाने सनातन संस्थेच्या वतीने ‘गंगारक्षण’ या विषयावर प्रदर्शन आयोजित !

गंगा नदीत दूषित पाणी जाणार नाही, यासाठी प्रयत्न करणे, हेच ख-या अर्थाने गंगारक्षण आहे. दुर्दैवाने ‘नमामि गंगे’ प्रकल्पाच्या अंतर्गत सरकारकडून या दृष्टीकोनातून अपेक्षित प्रयत्न झाले नाहीत, अशी खंत ‘गंगा आव्हान आंदोलना’चे प्रणेते श्री. हेमंत ध्यानी यांनी कुंभनगरी येथे व्यक्त केली.

सनातनच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून हिंदु संस्कृती जतन करण्याचे कार्य होत आहे ! – ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे, संत तुकाराम महाराजांचे वंशज, पंढरपूर

सनातन संस्थेने भारतीय संस्कृतीवर आधारित प्रदर्शन लावल्यामुळेे आपल्या परंपरांचे महत्त्व लोकांना कळत आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून हिंदु संस्कृती जतन करण्याचे कार्य होत आहे, असे प्रतिपादन संत तुकाराम महाराज यांचे वंशज आणि पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानचे विश्वस्त ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे यांनी येथे केले.

सनातन संस्थेच्या प्रदर्शनातून साधना, राष्ट्र व धर्मरक्षण करण्यासाठी अनेकांना ज्ञान मिळत आहे – आदिश्‍वर नीलकंठ शिवाचार्य महास्वामी धारेश्‍वर महाराज

सध्या स्वातंत्र्य स्वैराचाराकडे जाऊ लागले आहे. यामुळेच अनेक अनर्थ होऊ लागले आहेत. राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य यशस्वी होण्यासाठी ही वाईट प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजे, असे प्रतिपादन सातारा येथील तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान धारेश्वर मठाचे श्री.ष.ब्र.प्र.१०८ आदिश्वर नीलकंठ शिवाचार्य महास्वामी धारेश्वर महाराज यांनी येथे केले.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून संस्कृतीला वाचवण्यासाठी चांगले प्रयत्न ! – साध्वी डॉ. प्राची

सनातन संस्थेकडून सनातन संस्कृतीला वाचवण्यासाठी चांगले प्रयत्न होत असल्याचे प्रतिपादन विश्‍व हिंदु परिषदेच्या साध्वी डॉ. प्राची यांनी येथे केले.

भारत हिंदु राष्ट्र बनले पाहिजे ! – श्री महंत हरिहरानंद भारतीजी महाराज

जगात अन्य धर्मियांची राष्ट्रे आहेत; परंतु हिंदूंचे कोणतेही राष्ट्र नाही, ही दु:खाची गोष्ट आहे. भारत हिंदु राष्ट्र बनले पाहिजे. यासाठी सरकारकडे मागणी केली पाहिजे, असे प्रतिपादन श्री महंत हरिहरानंद भारतीजी महाराज यांनी प्रयागराज येथे केले.

पंच दशनाम महानिर्वाणी आखाड्याचे स्वामी रामगिरी बापू मेहसाणा यांची सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट !

गुजरात येथील पंच दशनाम महानिर्वाणी आखाडा आणि खोइसम गुजरात संप्रदायाचे स्वामी रामगिरी बापू मेहसाणा अवधेशाश्रम यांनी २८ जानेवारी या दिवशी सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली.

‘गंगा आव्हान आंदोलना’चे प्रणेते हेमंत ध्यानी यांची सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट !

‘गंगा आव्हान आंदोलना’चे प्रणेते श्री. हेमंत ध्यानी यांनी २८ जानेवारी या दिवशी येथील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. या वेळी त्यांनी हिंदु जनजागृती समितीचे सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्याशी ‘राष्ट्र आणि धर्म’ याविषयी चर्चा केली.

प्रयागराज (कुंभनगरी) येथील सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला श्री अभिषेक महाराज यांची सदिच्छा भेट

दरबार श्री पिंडोंरी धामचे श्री अभिषेक महाराज यांनी २७ जानेवारीला येथील कुंभमेळ्यातील सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला सदिच्छा भेट दिली.

श्री हालसिद्धनाथ देव आणि श्री विठ्ठल बिरदेव यांचा भक्तगणांसह रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला चरणस्पर्श !

श्री हालसिद्धनाथ, श्री विठ्ठल बिरदेव आणि पू. डोणे महाराज यांचे आश्रमात आगमन होतांना प्रवेशद्वाराशी सुवासिनींनी त्यांच्या चरणांवर जल घातले. देवाच्या अश्‍वाचीही पूजा करण्यात आली.

सनातनचे कार्य चांगले आहे ! – श्री श्री १०८ श्री महंत घनश्यामदास बापू

सनातनचे ग्रंथप्रदर्शन उत्कृष्ट असून सनातनचे कार्य चांगले आहे, असे प्रतिपादन गुजरात राज्यातील राजकोट येथील अखिल भारतीय वैष्णव विरक्त संत महामंडळाचे श्री श्री १०८ श्री महंत घनश्यामदास महाराज यांनी २७ जानेवारीला येथे केले.