
प्रयागराज (कुंभनगरी) – येथील सनातनचे प्रदर्शन पाहून पुष्कळ प्रसन्नता वाटली. तुम्ही एवढा प्रचार करत आहात, त्यामुळे विश्वात तुमच्या कार्याला यश अवश्य मिळेल. या प्रदर्शनात विविध ग्रंथांतून माहिती देऊन तुम्ही हिंदुत्व जागृत करत आहात. मला आतून एवढा आनंद झाला आहे की, येथून मला जावेसे वाटत नाही. तुमच्या गुरुदेवांनी जे पाऊल उचलले आहे, ते चांगले आहे. गीता, भागवत, गंगा, गो, सरस्वती, हिंदुत्व आणि शिष्टाचार समाप्त होत आहेत. ते वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहात. आपण पुष्कळ श्रम करत आहात, हे पाहून चांगले वाटले, असे प्रतिपादन कानपूर जिल्ह्यातील गोरियापूर गावातील अखिल भारतीय श्रीपंचबारामाई दाडीया खालसाचे महंत श्री देवनारायणदास वेदांताचार्य महाराज यांनी २७ जानेवारी या दिवशी येथे केले.
महंत देवनारायणदास वेदांताचार्य महाराज आणि त्यांच्यासमवेत आलेले महंत श्री वैष्णुदास बिथान (बिहार) यांनी सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यांचे समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी अन् राजस्थान आणि मध्यप्रदेश राज्यांचे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी या दोन्ही संतांना ग्रंथप्रदर्शनाची सविस्तर माहिती दिली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी महंत श्री देवनारायणदास वेदांताचार्य महाराज आणि महंत श्री वैष्णवदास बिथान यांचा सन्मान करून त्यांना सनातनचा ‘गंगाजीकी महिमा’ हा ग्रंथ भेट दिला.
श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांची सनातन आश्रमाला मंगलमय भेट !
सनातन धर्मयुगाच्या स्थापनेसाठी सनातन संस्था फार मोठा पुरुषार्थ करत आहे ! – योगऋषी रामदेवबाबा
महाकुंभ येथे सनातन संस्थेच्या प्रदर्शनाला जिज्ञासू, हिंदुत्ववादी, मान्यवर आणि संत यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा महाकुंभ...
महाकुंभ मेळ्यात सनातन संस्थेच्या ‘फिरत्या वितरण कक्षां’द्वारे भाविकांमध्ये धर्मप्रचार !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडून आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत रवींद्र...