सनातनच्या कार्याला माझेही सहकार्य असेल ! – श्री महंत कृष्णदास महाराज, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय श्री पंच दिगंबर अग्नि आखाडा

प्रयागराज येथील कुंभमेळ्यात सनातन संस्था आणि
हिंदु जनजागृती समिती यांचे चालू असलेले राष्ट्र अन् धर्म प्रसाराचे कार्य !

श्री महंत कृष्णदास महाराज (बसलेले) यांना ‘हिन्दू राष्ट्र क्यों आवश्यक है ?’ हा ग्रंथ भेट देतांना सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

प्रयागराज (कुंभनगरी) – सनातनचे ग्रंथप्रदर्शन अतिशय चांगले आहे. असे प्रदर्शन लावल्यामुळे अध्यात्मप्रसार होऊन देशात हळूहळू सर्वत्र जागृती होईल. विश्‍वात हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी असे प्रदर्शन लावून तुम्ही हिंदूंना जागृत करत आहात. हा चांगला भाग असून या कार्यात मीही तुम्हाला सहकार्य करीन, असे प्रतिपादन अखिल भारतीय श्री पंच दिगंबर अग्नि आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री महंत कृष्णदास महाराज यांनी २८ जानेवारीला येथे सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिल्यानंतर केले.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी यांनी श्री महंत कृष्णदास यांना ग्रंथप्रदर्शनाची माहिती दिली. यानंतर सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी महाराजांचा सन्मान करून त्यांना ‘हिन्दू राष्ट्र क्यों आवश्यक है ?’ हा हिंदु जनजागृती समितीचा ग्रंथ भेट दिला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment