कुंभमेळ्यातील सनातनच्या ‘धर्मशिक्षण’ आणि ‘राष्ट्र-धर्म रक्षण’ यांसंबंधीच्या फलक प्रदर्शनास जिज्ञासू, साधू, संत-महंत यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

सनातनचे ग्रंथप्रदर्शन पहातांना साधू-संत

प्रयागराज (कुंभनगरी) – कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सनातन संस्थेने सेक्टर १५, मोरी मार्ग-मुक्ती मार्गाच्या चौकात ‘धर्मशिक्षण तथा राष्ट्र-धर्म रक्षणासंबंधी फलक प्रदर्शना’चे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाला जिज्ञासू, धर्मप्रेमी, साधू, संत-महंत यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. बरेच धर्मप्रेमी, साधू, संत- महंत आणि पोलीस यांनी सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. ‘प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील त्रिवेणी संगमावर गंगा आणि यमुना नदी दिसून येते; मात्र त्या ठिकाणी सरस्वती नदी लुप्त पावलेली आहे, असे भाविक म्हणतात; मात्र आम्ही तर म्हणतो की, या लुप्त पावलेल्या सरस्वतीचे दर्शन सनातनच्या ग्रंथप्रदर्शनात होते. कोण म्हणते सरस्वती लुप्त पावली, सरस्वतीचे दर्शन तर चक्क सनातनच्या ग्रंथप्रदर्शनात आहे’, असे मौलिक अभिप्राय बरेच धर्मप्रेमी, साधू, संत-महंत यांच्याकडून सतत मिळत आहेत.

वर्तमान लोकशाहीत कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये बायबल आणि मदरशांमध्ये कुराण शिकवले जात आहे; मात्र सामान्य हिंदूंना त्यांच्या धर्माचे शिक्षण देण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे ‘सनातन धर्म म्हणजे काय आहे ?’, ‘त्याचे आचरण कसे करावे ?’, हे हिंदूंना ठाऊक नाही. हिंदु समाजाला सहज भाषेत धर्मशिक्षण देण्याचा प्रयत्न करणे, हा या काळातील श्रेष्ठ धर्मप्रसार आहे. याची माहिती समाजातील हिंदूंना होण्यासाठी सनातनने ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन केले आहे. यामध्ये संस्कृतीचे पालन करणे, देवालय-दर्शन, धार्मिक कृत्यांचे अध्यात्मशास्त्र, देवतांची उपासना, साधना आदी धर्मशिक्षणासंबंधी तथा गंगारक्षण, गोरक्षण, मंदिरांचे रक्षण, क्रांतीकारकांचे स्मरण, हिंदु राष्ट्र, सामाजिक दुष्प्रवृत्तींचे निर्मूलन आदी राष्ट्र-धर्म रक्षणासंबंधीच्या विषयांवरील ग्रंथ आणि फलक यांचा समावेश आहे. हे प्रदर्शन प्रतिदिन सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले आहे.

धर्मप्रेमी, साधू, संत-महंत यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया !

१. पंडित विनय मालवीय, खण्डवा, मध्यप्रदेश : भारत नेहमी सनातन धर्माचाच राहिला आहे. यामध्ये कोणत्याही व्यक्तीपेक्षा केवळ शास्त्राला प्रमाण मानले गेले आहे. ते शास्त्र नि परंपरा यांना लोकांमध्ये पोहोचवणारे आदरणीय आठवले गुरुजी (सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले) यांना माझा कोटी कोटी प्रणाम !

२. श्री. सोनपाल सिंह, बुलंदशहर : हे प्रदर्शन पाहून पुष्कळ चांगले वाटले. आपल्या राष्ट्राप्रतीची निष्ठा प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात असायला हवी. प्रत्येक सरकारी शाळेतील मुलांच्या नसानसांत देशभक्ती रुजवली गेली पाहिजे.

३. श्री. सुनील कुमार, उत्तरप्रदेश : सनातनचे ग्रंथप्रदर्शन पाहून मला पुष्कळ चांगले वाटले. वेळेअभावी मी प्रदर्शनाला अधिक वेळ नाही दिला, तरी मी येथे पुन्हा येण्यासाठी प्रयत्न करीन.

४. श्री. अर्जुन सिंह, आदमपूर (जिल्हा हरिद्वार, उत्तराखंड) : सनातन धर्म म्हणजेच आपला हिंदु धर्म ! प्रत्येक परिस्थितीत संघटितपणे सनातन धर्माला पुढे नेले पाहिजे. संघटितपणे कार्य केल्यास आपण प्रत्येक संकटाचा सामना करू शकतो.

५. श्री. संजय कुमारसिंह, प्रयागराज : हे प्रदर्शन आवडले. मी सनातन प्रभातचा वार्षिक सदस्य होईन.

६. श्री. अनिल कुमार तिवारी, सुकरक्षेत्र (जिल्हा कासगंज, उत्तरप्रदेश) : हे प्रदर्शन पुष्कळ चांगले आहे. माझ्या जागृती संस्थेच्या वतीने मी सांगतो की, कासगंज जिल्ह्यातील आदितीर्थ सोरोसुकरक्षेत्र येथे माझे निवासस्थान आहे. तेथे सनातनच्या वतीने असे प्रदर्शन लावून जनजागृती करावी.

७. श्री चांदोजी महाराज, छोटी छावनी, लवकुश, हरिद्वार, उत्तराखंड : या प्रदर्शनातून कृती करण्याविषयी शिकायला मिळते. तुम्ही कधीही भ्रमणभाष केल्यास माझे अनुयायी तुम्हाला भेटून सहकार्य करतील.

क्षणचित्र

गुजरात राज्यातील भावनगर येथील श्री नानी खोडीयार मंदिराचे श्री श्री १००८ नानी खोडीयार शक्ती पीठाधीश्‍वर यज्ञसम्राट श्री स्वामी महामंडलेश्‍वर श्री महंत श्री गरीबराम बापू परमहंस आणि अतीत गुरु श्री महामंडलेश्‍वर श्री हरी भजनदास महाराज यांनी सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली.

सनातनच्या ग्रंथप्रदर्शनातील धर्मज्ञान संपूर्ण कुंभमेळ्यात मिळणार
नाही ! – सौ. सविताबेन पटेल, शिवशक्ती कार्गील चौक, सूरत (गुजरात)

‘मला सनातनचे ग्रंथप्रदर्शन पुष्कळ आवडले. हे प्रदर्शन पाहून आम्ही निःशब्द झालो आहोत. ‘संपूर्ण कुंभमेळ्यात असे धर्मज्ञान कोठे असेल’, असे आम्हाला वाटत नाही. तुमचे प्रदर्शन आमच्या गावी आणू शकाल का ? अशा प्रदर्शनातून बोध घेऊन आमच्या गावातील लोक तोकडे कपडे घालायचे बंद करतील. सनातनचे साधक प्रदर्शन दाखवतांना आम्हाला अगदी आमचे वाटत होते. आपण आम्हाला नक्की संपर्क करा !  या प्रदर्शनातून आमचे डोळे उघडले आहेत. तुम्ही आमच्या गावात येऊन लवकर प्रसार करा !’ (सौ. सविताबेन पटेल यांनी ७ महिलांना स्वत:समवेत ग्रंथप्रदर्शनाला आणले होते.)

जे प्रयागराज येथील पोलिसांना कळते, ते सनातनच्या पाठीमागे चौकशीचा ससेमिरा लावणार्‍या तपासयंत्रणा आणि सनातनची नाहक अपकीर्ती करण्यात गुंतलेली प्रसिद्धीमाध्यमे यांना कसे कळत नाही ?

सनातनचे ग्रंथप्रदर्शन पाहून २ पोलीस म्हणाले, ‘‘आम्हाला कुंभमेळ्यात गंगा आणि यमुना या नद्यांसमवेत सरस्वतीचे दर्शन सनातनच्या ग्रंथप्रदर्शनात झाले आहे.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment