गंगास्नानाविषयी संभ्रम निर्माण करणार्‍या हिंदुद्वेष्ट्यांचे षड्यंत्र यशस्वी होऊ देऊ नका ! – सनातन संस्था

कुंभमेळा प्रयागराज २०१९

आखाडा परिषद आणि आध्यात्मिक संघटना यांना सनातन संस्थेचे आवाहन !

  • भारतात आणि उत्तरप्रदेशात हिंदुत्वनिष्ठ सरकार असूनही हिंदूंच्या सर्वांत मोठ्या कुंभपर्वाविषयी असे अपप्रचार करण्याचे धारिष्ट्य हिंदुद्वेषी मंडळी कशी करतात ?
  • इतकी वर्षे सत्तेत असूनही अशा हिंदुद्वेषी मंडळींवर वचक निर्माण करणारे कायदे शासनकर्त्यांनी केले नाहीत आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली नाही. त्यामुळे त्यांचे फावले आहे !
  • व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्या सण-उत्सवांविषयीचा अपप्रचार आणखी किती काळ सहन करायचा ? हे रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

प्रयागराज (कुंभनगरी), २४ जानेवारी (वार्ता.) – समस्त सनातनधर्मी हिंदु समाज कुंभपर्वात गंगास्नान करणे, याला पुण्यकारी मानतो. कुंभमेळ्याच्या निमित्ताने कोट्यवधी भाविक गंगानदीत डुबकी घेऊन त्यांच्या पापांचे क्षालन करतात. अशा श्रद्धेच्या कुंभमेळ्यात हिंदुद्वेष्ट्यांकडून विदेशी शक्तींच्या साहाय्याने गंगास्नानाविषयी संभ्रम निर्माण करण्यात येत आहे. गेल्या २ दिवसांत ट्विटर ट्रेन्डवर ‘#kumbhsnan_blindfaith’ ( कुंभस्नान_अंधश्रद्धाभक्ती) हा ‘हॅशटॅग’ वापरून ‘कुंभस्नान गीताविरोधी आहे’, ‘अंधश्रद्धा भक्तांना संकटे निर्माण करणारी आहे’, अशा प्रकारचा दुष्प्रचार केला जात आहे. गंगास्नानाच्या संबंधी संभ्रम निर्माण करून हिंदु समाजाला विघटित करण्याचे षड्यंत्र हिंदुद्वेषी शक्तींनी रचले आहे. या कारणास्तव आखाडा परिषद, आध्यात्मिक संघटना आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी गंगास्नानाच्या विरोधातील या दुष्प्रचाराला रोखून हिंदु धर्मविरोधींचे षड्यंत्र यशस्वी होऊ देऊ नये, असे आवाहन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी २४ जानेवारीला एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

श्री. चेतन राजहंस

श्री. चेतन राजहंस यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की…

१. कुंभपर्वात गंगास्नान शास्त्रसंमत आहे. स्वयं गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ‘‘सर्व प्रवाहात मी गंगा आहे !’’

२. त्यासाठी गंगास्नान प्रासादिक आहे. गीतेतील वचनांमध्ये छेडछाड करून कुंभस्नानाविषयी संभ्रम निर्माण करणारे जन्महिंदू हे धर्मविरोधी आहेत. स्कंदपुराणात ‘कुंभपर्वात गंगास्नान केल्याने अत्यंत पुण्य मिळते’, असे वचन सांगितले आहे.

३. वेद-पुराण यांच्या वचनानुसार श्रद्धा ठेवून कोट्यवधी भाविक गंगास्नान करतात. त्यांच्या श्रद्धेशी खेळून ‘ज्ञान-गंगा’ तथा ‘अंधश्रद्धा भक्ती खतरा-ए-जान’ या पुस्तकांचा प्रचार केला जात आहे.

४. उत्तरप्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या पुस्तकांवर त्वरित कारवाई करावी तथा हिंदु समाजाला आश्‍वस्त करावे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

५. ‘अंधश्रद्धा भक्ती खतरा-ए-जान’ या शब्दांवरूनच हे निधर्मी शक्तींचे आक्रमण आहे, असे अनुमान आपण लावू शकतो. ‘अशा शक्तींना कुंभक्षेत्रात प्रवेश दिला जाऊ नये’, असे आवाहन आम्ही अखिल भारतीय आखाडा परिषदेला करत आहोत’, असे श्री. चेतन राजहंस यांनी म्हटले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment