सनातन संस्थेच्या वतीने साधू-संतांचे स्वागत : साधूंकडून सनातनचा जयघोष

येथील पहिल्या राजयोगी स्नानाच्या पार्श्‍वभूमीवर पहाटे ४ वाजता आखाड्यांच्या शोभायात्रा वाजत-गाजत त्रिवेणी संगमावर निघाल्या. त्या वेळी सनातनच्या साधकांनी हातात फलक धरून त्यांचे स्वागत केले. स्नानासाठी जाणार्‍या अनेक साधूंनीही ‘सनातन की जय’, ‘सनातन धर्म की जय’, असा जयघोष केला.

वैष्णव आखाड्यांच्या ध्वजारोहणाच्या वेळी सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून संतांचे स्वागत !

५ जानेवारी या दिवशी कुंभमेळाक्षेत्री श्री पंच दिगंबर अनी आखाडा, श्री पंच रामान्दीय निर्वाणी आखाडा आणि श्री पंच रामान्दीय निर्मोही आखाडा या ३ प्रमुख वैष्णव आखाड्यांचे ध्वजारोहण भावपूर्ण अन् उत्साहात पार पडले.

‘झी २४ तास’ या वृत्तवाहिनीवरील ‘रोखठोक’ कार्यक्रमात ‘देवाला कपड्याचे वावडे ?’ या विषयावरील चर्चासत्रात सनातनचा सहभाग

सरकारने ‘टेम्पल अक्ट’ हा नवीन कायदा देवस्थान समितीला दिलेला आहे. त्यामुळे मंदिर देवस्थान समितीला योग्य निर्णय घेण्याचा अधिकार आहे. तोकडे कपडे परिधान न करण्याविषयीचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे आवाहन अतिशय योग्य आहे.

केरळ राज्यातील साडे सहा लाखांपेक्षा अधिक लोकांना आपल्या वेढ्यात घेणारा भयावह जलप्रलय !

संकटकाळात लोक सरकारवर पूर्णपणे अवलंबून असतात; पण सरकारकडून साहाय्य पुष्कळ उशिराने चालू झाले. अलप्पू जिल्ह्यातील कुट्टनाड परिसरात महिन्याभरापासून पाणी होते; पण सरकारकडून तेथे साहाय्यकार्य पुष्कळ उशिराने चालू झाले.

भगवान परशुराम यांची कृपा लाभलेल्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती उच्चकोटीचा भाव असलेल्या म्हापसा (गोवा) येथील पू. (श्रीमती) सुशीला आपटेआजी (वय ८१ वर्षे) सद्गुरुपदी विराजमान !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती उच्चकोटीचा भाव असलेल्या म्हापसा (गोवा) येथील पू. (श्रीमती) सुशीला आपटेआजी या सद्गुरुपदी विराजमान झाल्याची घोषणा सनातनच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केली. 

श्री विठ्ठल आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार श्रद्धा असलेले पंढरपूर येथील ह.भ.प. बाळासाहेब बडवे महाराज ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

विठ्ठलाप्रती उत्कटभक्ती असलेले पंढरपूर येथील ह.भ.प. बाळासाहेब बडवे महाराज (वय ७२ वर्षे) हे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फे-यांतून मुक्त झाल्याची घोषणा १ ऑगस्ट या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात करण्यात आली.

‘सनातन शॉप’च्या गुजराती भाषेतील संकेतस्थळाचे अनावरण पू. पृथ्वीराज हजारे यांच्या हस्ते संपन्न

गुरुपौर्णिमेच्या मंगलदिनी, म्हणजेच २७ जुलै या दिवशी सनातन-निर्मित ग्रंथांच्या विक्रीचे ‘ऑनलाईन’ संकेतस्थळ ‘सनातन शॉप’च्या गुजराती भाषेतील संकेतस्थळाचे अनावरण सनातनचे संत पू. पृथ्वीराज हजारे यांच्या हस्ते येथील सनातनच्या आश्रमात करण्यात आले.

खडतर प्रसंगांना सामोरे जाऊनही सतत कृतज्ञताभावात असणार्‍या श्रीमती सत्यवती दळवीआजी (वय ८३ वर्षे) संतपदी विराजमान !

गुरुपौर्णिमेच्या मंगलदिनी सनातनच्या देवद येथील आश्रमात झालेल्या चैतन्यदायी सोहळ्यात पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांनी श्रीमती सत्यवती शांताराम दळवीआजी (वय ८३ वर्षे) या संतपदी विराजमान झाल्याची भावपूर्ण घोषणा केली.

कृतज्ञताभावात असलेले आणि श्री गुरूंचा स्थूल अन् सूक्ष्म सत्संग नित्य अनुभवणारे सनातनचे २३ वे संत पू. विनायक कर्वेमामा !

वर्ष १९९६ मध्ये सांगली येथे मी सनातनची पहिली गुरुपौर्णिमा अनुभवली आणि तेव्हापासून मी क्रियाशील होऊन सेवेला आरंभ केला.

बंगालमधील डॉ. शिवनारायण सेन यांनी ६५ टक्के, तर डॉ. कौशकचंद्र मल्लिक आणि तमिळनाडू येथील अर्जुन संपथ यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

बंगालसारख्या प्रतिकूल परिस्थितीत धर्मशास्त्राची ज्योत तेवत ठेवण्याचे कार्य करणारे शास्त्रधर्म प्रचारसभेचे सचिव डॉ. शिवनारायण सेन यांनी ६५ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, असे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी हिंदू अधिवेशनात घोषित केले.