भक्तांद्वारे मंदिराचे उत्कृष्ट व्यवस्थापन पहाणारे शिवशंकर पाटील यांचा आदर्श सर्वच मंदिर विश्वस्तांनी घ्यावा ! – चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था
कथित गैरव्यवस्थापनाच्या नावाखाली महाराष्ट्र सरकारने राज्यातील अनेक मोठी मंदिरे स्वतःच्या नियंत्रणात घेतली. अनेक मंदिरांतील भक्तांचे विश्वस्त मंडळ विसर्जित केले. त्या वेळी भक्तांच्या माध्यमांतून सचोटीने कार्य करून मंदिर व्यवस्थापन उत्कृष्ट सांभाळून मंदिर सरकारीकरणाला पर्याय निर्माण करणारे शेगाव येथील ‘श्री गजानन महाराज संस्थान’चे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकर पाटील यांनी सर्व हिंदू आणि मंदिर विश्वस्त यांच्यासमोर आदर्श निर्माण केला आहे.
