भीषण आपत्काळ आरंभ होण्यापूर्वीच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ग्रंथनिर्मितीच्या कार्यात सहभागी होऊन शीघ्र ईश्वरी कृपेस पात्र व्हा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले संकलित करत असलेल्या ग्रंथांतील ज्ञानाने समाज सात्त्विक (साधक) होऊन तो हिंदु राष्ट्रासाठी पोषक होणार आहे.

युवकांनो, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चैतन्यदायी ग्रंथकार्याची पताका फडकत ठेवण्यासाठी ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी व्हा !

ग्रंथसेवेच्या अंतर्गत संकलन, भाषांतर, संरचना, मुखपृष्ठ-निर्मिती, ग्रंथछपाईसंबंधाने करायच्या सेवा इत्यादी विविध सेवांमध्ये सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी स्वत:ची माहिती सनातनच्या जिल्हासेवकांच्या माध्यमातून पाठवावी.

सनातन धर्म नष्‍ट करण्‍याची भाषा करणार्‍यांच्‍या मनात सनातनी हिंदूंचा वंशविच्‍छेद हेच ध्‍येय ! – चेतन राजहंस, राष्‍ट्रीय प्रवक्‍ते, सनातन संस्‍था

महाराष्‍ट्रातील सनातनधर्मीय हिंदु समाजाने सजग होण्‍याची आणि लोकशाही मार्गाने या सनातन धर्मविरोधी वक्‍तव्‍यांचा प्रतिवाद करण्‍याची आवश्‍यकता आहे, असे आवाहन सनातन संस्‍थेचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते श्री. चेतन राजहंस यांनी केले.

एर्नाकुलम् (केरळ) येथे सनातन संस्‍थेच्‍या वतीने ‘आनंदी जीवनासाठी अध्‍यात्‍म’ या विषयावर व्‍याख्‍यान पार पडले !

‘अध्‍यात्‍माची आवश्‍यकता, मंदिरात दर्शन घेण्‍याची योग्‍य पद्धत, कुलदेवतेची पूजा का आणि कशी करावी ?’, या विषयांवर मार्गदर्शन केले. या व्‍याख्‍यानाचा लाभ ‘श्री नारायण धर्मपरिपालन योगम’च्‍या अनेक सदस्‍यांनी घेतला.

नवरात्रीच्या काळात सनातन संस्थेच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात करण्यात येत आहेत ‘दशमहाविद्या याग’ !

सनातन संस्थेच्या आश्रमात १५ ते २४ ऑक्टोबर २०२३ या दिवसांमध्ये ‘दशमहाविद्या यज्ञ’ करण्यात येत आहेत. १५ ऑक्टोबर या दिवशी ‘कालीयाग’ आणि १६ ऑक्टोबरला ‘तारायाग’ पार पडला.

भार्गवश्री बी.पी. सचिनवाला (वसई) यांच्‍या श्री परशुराम तपोवन आश्रमाला सनातनच्‍या सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांची सदिच्‍छा भेट !

भार्गवश्री बी.पी. सचिनवाला यांच्‍या पालघर जिल्‍ह्यातील वसई तालुक्‍यातील मेेढे या गावातील श्री परशुराम तपोवन आश्रमात सनातन संस्‍थेच्‍या धर्मप्रचारक सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांनी २६ सप्‍टेंबर या दिवशी सदिच्‍छा भेट दिली.

अखिल मानवजातीला अध्यात्मजगताची नावीन्यपूर्ण ओळख करून देणार्‍या सनातन संस्थेच्या कलेशी संबंधित सेवांमध्ये सहभागी होऊन धर्मकार्यात आपले योगदान द्या !

सनातन संस्थेच्या कलेशी संबंधित सेवांमध्ये सहभागी होऊन धर्मकार्यात आपले योगदान द्या !

सनातन संस्थेची हेतूतः अपकीर्ती करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करणार! – सनातन संस्था

नुकताच नालासोपारा प्रकरणामध्ये प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि ‘हिंदु गोवंश रक्षा समिती’चे श्री. वैभव राऊत यांना जामीन मिळाला आहे. दैनिक लोकसत्ताने श्री. वैभव राऊत यांना जामीन मिळाल्याच्या बातमीमध्ये त्यांचा ‘सनातनचे कथित सदस्य’ असा उल्लेख केला आहे; मात्र वैभव राऊत यांच्या छायाचित्राच्या जागी हेतूतः सनातन संस्थेचे अधिकृत राष्ट्र्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांचे छायाचित्र वापरले आहे.

पूर्वजांचे त्रास दूर होण्यासाठी पितृपक्षात दत्ताचा नामजप, प्रार्थना आणि श्राद्धविधी करा !

‘सध्या अनेक साधकांना अनिष्ट शक्तींचे त्रास होत आहेत. पितृपक्षात (२९ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर २०२३ या काळात) हा त्रास वाढत असल्याने त्या कालावधीत प्रतिदिन ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ।’ हा नामजप न्यूनतम १ घंटा करावा.

सात्त्विक उत्‍पादनांच्‍या संदर्भातील सेवांसाठी साधकांची तातडीने आवश्‍यकता !

देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमात सात्त्विक उत्‍पादनांच्‍या संदर्भात मोठ्या प्रमाणावर सेवा उपलब्‍ध आहेत. साबण, उदबत्ती, त्रिफळा चूर्ण, दंतमंजन, उटणे, अत्तर, कापूर, कुंकू, अष्‍टगंध इत्‍यादी सात्त्विक उत्‍पादने बाहेरून बनवून घेतली जातात आणि त्‍यांची बांधणी (पॅकिंग) देवद आश्रमात केली जाते.