
कोल्हापूर – ‘विश्वमांगल्य सभा’ हे महिलांचे राष्ट्रव्यापी संघटन गेल्या १६ वर्षांपासून कार्यरत असून ते राष्ट्रचिंतन, समाजचिंतन, परिवारचिंतन, मातृचिंतन यांसाठी कटीबद्ध आहे. या सभेच्या वतीने समाजाप्रती नि:स्वार्थ सेवाभाव आणि चिंतनशील मातृत्व जपत ‘शौर्य क्षेत्रा’त केलेल्या कार्याविषयी सनातनच्या साधिका सौ. माहेश्वरी सरनोबत यांचा ‘सप्तमातृका सन्माना’च्या अंतर्गत ‘शक्तीरूपेण संस्थिता’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हा पुरस्कार विश्वमांगल्य संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा रेखाताई खंडेलवाल, विश्वमांगल्य सभेच्या सभाचार्या प.पू. अखंड सौभाग्यवती रेणुकामाई, ‘भागीरथी महिला संस्थे’च्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत सौ. माहेश्वरी सरनोबत यांना देण्यात आला. हा कार्यक्रम सायबर महाविद्यालयाच्या आनंदभवनच्या सभागृहात ११ एप्रिल या दिवशी पार पडला.
या प्रसंगी सत्काराला उत्तर देतांना सौ. माहेश्वरी सरनोबत यांनी हे कार्य करत असतांना त्यांना नामजपाचा कसा लाभ झाला ?, ‘आर्यन मॅन’ स्पर्धेत कठीण प्रसंगांत श्री हनुमान, तसेच विविध देवतांचे त्यांना कसे साहाय्य झाले ? आणि आजच्या युवती-महिला आज काय करणे अपेक्षित आहे ? हे सांगितले. हा पुरस्कार सांगली येथील डॉ. शार्दुली तेरवाडकर, नाशिक येथील डॉ. सुमुखी अथणी, अहिल्यानगर येथील सौ. धनश्री सुजय विखे-पाटील, पुणे येथील सुमेधा योगेश चिथडे, पुणे येथील मेजर मैत्रेयी दांडेकर आणि डॉ. आर्या आशुतोष जोशी यांनाही देण्यात आला.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !