गुरुपौर्णिमेनिमित्त अमरावती आणि अकोला येथे पत्रकार परिषद पार पडली

१६ जुलै या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता येथे अंबा मंगलम आणि अकोला येथे जानोरकर मंगल कार्यालय याठिकाणी सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

वर्ष २०१९ मधील चातुर्मासात प्रतिकूल ग्रहमान असल्याने त्या कालावधीत गुरूंना अनन्यभावे शरण जाऊन साधना वाढवा आणि संधीकालाचा लाभ घ्या !

‘आषाढ शुक्ल पक्ष एकादशी (देवशयनी एकादशी) ते कार्तिक शुक्ल पक्ष एकादशी (प्रबोधिनी एकादशी) या चार मासांना ‘चातुर्मास’, असे म्हणतात.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक सहस्र पटींनी कार्यरत गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !

गुरुपौर्णिमा महोत्सवात सहभाग घेऊन गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक सहस्र पटींनी कार्यरत असलेल्या गुरुतत्त्वाचा लाभ करून घेण्यासाठी सर्व राष्ट्र आणि धर्म प्रेमी हिंदूंनी सहकुटुंब उपस्थित रहावे, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

विश्‍वरूपे कुटुंबाने जपली देवभाषेची ओळख

‘संस्कृत ही संवादाची भाषा होऊ शकते’, ही गोष्ट येथील तात्या टोपेनगर येथे रहाणारे प्रा. अच्युत विश्‍वरूपे यांच्या कुटुंबाने सिद्ध केली आहे. त्यांची २ मुले, सुना, २ नातवंडे आपापसात केवळ संस्कृतमध्येच संवाद साधतात.

भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक आणि ज्येष्ठ संशोधक अन् ज्ञानमार्गानुसार साधना करणारे ठाणे येथील डॉ. शिवकुमार ओझा (वय ८५ वर्षे) संतपदी विराजमान !

भारतीय संस्कृतीच्या उत्थानासाठी समर्पित भावाने अलौकिक कार्य करणारे ठाणे येथील डॉ. शिवकुमार ओझा (वय ८५ वर्षे) ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ८ जुलै या दिवशी संतपदी विराजमान झाले.

‘चंद्रयान-२’चे प्रक्षेपण यशस्वी होण्यासाठी इस्रोच्या अध्यक्षांची श्रीकृष्ण मठाला भेट

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रोच्या) अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘चंद्रयान-२’चे प्रक्षेपण यशस्वी व्हावे; म्हणून इस्रोचे अध्यक्ष के. सिवन् यांनी उडुपी येथील श्रीकृष्ण मठाला भेट दिली. के. सिवन् हे सहकुटुंब श्रीकृष्ण मठात आले होते.

सकाळी लवकर उठणार्‍या महिलांना ‘ब्रेस्ट कॅन्सर’चा धोका अल्प रहातो

सकाळी लवकर उठणा-या महिलांना अधिक घंटे झोपणा-या महिलांच्या तुलनेत स्तनाच्या कर्करोगाचा (‘ब्रेस्ट कॅन्सर’चा) धोका अल्प असतो, असा निष्कर्ष एका सर्वेक्षणाअंती काढण्यात आला आहे.

संगणकीय प्रती काढण्यासाठी पाठकोरे आणि कोरे कागद उपलब्ध करून देऊन राष्ट्र अन् धर्म कार्यात हातभार लावावा !

धर्माविषयी जागृती करण्यासाठी नियतकालिक प्रकाशित करणे, ग्रंथ निर्मिती करणे, तसेच ध्वनीचित्र-चकत्या सिद्ध करणे आदी सेवा संगणकीय साहाय्याने सनातनच्या आश्रमांमध्ये केल्या जातात.

देशातील मद्यसेवन करणार्‍या १६ कोटी लोकांमध्ये ५ कोटी ७० लाख लोक व्यसनी

देशातील १६ कोटी लोक मद्यसेवन करतात. त्यातील ५ कोटी ७० लाख लोकांना दारूचे व्यसन आहे, अशी माहिती सामाजिक न्याय आणि हक्क मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे.