
मिरज – येथील ब्राह्मणपुरीमधील सनातन आश्रमाला आळंदी देवाची येथील ‘श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती’चे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ यांनी ५ एप्रिल या दिवशी सायंकाळी ६ वाजता सदिच्छा भेट दिली. या वेळी श्री. संतोष देसाई यांनी त्यांना सनातन संस्थेच्या चालू असलेल्या ‘राष्ट्र आणि धर्म’ कार्याची सविस्तर माहिती दिली, तसेच त्यांना ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव-संकल्प रामराज्याचा’ हा ग्रंथ भेट दिला. या वेळी ह.भ.प. धनंजय दीक्षित, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री द्वारकाधीश मुदडा, सनातनच्या साधिका श्रीमती मधुरा तोफखाने, डॉ. (कु.) शिल्पा बर्गे, साधक श्री. योगेश जोशी आदी उपस्थित होते.
‘श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती’चे विश्वस्त योगी निरंजन नाथ गुरु शांतीनाथ पुढे म्हणाले की, समुद्रमंथनानंतर देवांना देवत्व प्राप्त झाले; परंतु त्यासाठी महादेवांना विषप्राशन करावे लागले. यातूनच सन्मार्गावर चालणे, साधना करणे आणि संघटन बांधणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चालवणे यांसाठी अपार कष्ट घ्यावे लागते अन् त्याग करावा लागतो, हे आपल्याला शिकायला मिळते. आपण मूर्तीपूजा करतो, याचाच अर्थ आपण दगडातही देव पहातो. हीच आपल्या संस्कृतीची महानता आहे. ही नित्यनूतन सनातन संस्कृतीच भारताची खरी शक्ती आहे.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !