रशिया-युक्रेन युद्ध अनेक वर्षे चालू राहू शकते ! – नाटो

पश्चिमी देशांना युक्रेनला दीर्घकाळ साहाय्य करत रहाण्याची सिद्धता ठेवावी लागेल. रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध काही वर्षे चालू राहू शकते.

जर रशिया युक्रेनमधून बाहेर गेला नाही, तर तिसरे महायुद्ध निश्चित ! – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की

झेलेंस्की पुढे म्हणाले की, युक्रेन रशियासमवेत शांतता कराराविषयी चर्चा करण्यास सिद्ध आहे; मात्र त्यासाठी आमच्या २ अटी आहेत. या चर्चेसाठी कोणत्याही तिसर्‍या देशाने हमी द्यावी, तसेच जनमत संग्रह केला पाहिजे.

अरबी समुद्रातील चक्रीवादळांच्या तीव्रतेमध्ये २० ते ४० टक्क्यांनी वाढ !

 उत्तर हिंदी महासागरातील प्रत्येक चौथ्या चक्रीवादळाचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात होत आहे. जगभरातील चक्रीवादळांपैकी ६ टक्के चक्रीवादळे उत्तर हिंदी महासागरात सिद्ध होत आहेत. अरबी समुद्रातील चक्रीवादळांची तीव्रता २० ते ४० टक्क्यांनी वाढली आहे, असे हवामान शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासातून दिसून आले आहे.

मारियुपोल (युक्रेन) येथे अन्न-पाण्यासाठी नागरिकांकडून एकमेकांवर होत आहेत आक्रमणे !

मारियुपोलमधल्या एका रुग्णालयावर केलेल्या आक्रमणात ६ वर्षांच्या मुलीसह ३ जण ठार झाले आहेत. या शहराला वेढा घालण्यात आल्याने अन्न, पाणी आणि वीज यांच्याविना नागरिकांना दिवस काढावे लागत आहेत. या भागात कडाक्याची थंडी असून अशा थंडीमध्ये अन्न-पाण्याखेरीज दिवस काढणे युक्रेनी नागरिकांसाठी अवघड बनले आहे.

युद्धामुळे जागतिक अन्न टंचाई आणि धान्याची भाववाढ होणार !

रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक स्तरावर अन्न टंचाई निर्माण होणार असून धान्याच्या किमतीत वाढ होण्याची भीती ‘यारा इंटरनॅशनल’ या खतनिर्मिती करणार्‍या जागतिक आस्थापनाने व्यक्त केली आहे. ६० हून अधिक देशांमध्ये कार्यरत असलेल्या या आस्थापनाचे प्रमुख स्वीन टोर होलसेथर यांनी ‘बीबीसी’शी बोलतांना ही भीती व्यक्त केली.

युक्रेन-रशिया युद्धाचा भारतियांसाठी बोध !

भारतात युद्ध चालू झाल्यावर ‘देशविरोधकांनी त्यांची तोंडे बंद ठेवली, तरी पुष्कळ’, अशी स्थिती आहे. लयाची देवता असलेल्या महादेवाची उपासना करणारे भारतीय खरे तर देव, अवतारी संत आणि ऋषिमुनी यांच्या कृपेमुळेच तरून जात आहेत. येत्या युद्धकाळातही भक्त तर तरून जाणारच; तरीही भारतियांनी सर्व स्तरांवर स्वतःची सिद्धता ठेवणे श्रेयस्कर !

युक्रेनमध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे पैसे देऊनही पाणी मिळेनासे झाले !

भूमिका शार्दूल आणि श्रुतिका चव्हाण या युक्रेनच्या पश्‍चिम भागातील लबीबमध्ये रहात असून तेथे त्या वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. त्यांना संपर्क केल्यावर त्यांनी वरील माहिती दिली. या दोघींनी भारतात परत येण्यासाठी विमानाचे तिकीट काढले होते; मात्र विमानसेवा बंद करण्यात आल्याने त्या तेथेच अडकून पडल्या आहेत.

संभाव्य युद्धस्थिती आणि भारत !

सध्या फुटीरतावाद्यांनी भारतात कधी नव्हता इतका कहर केला आहे. आतंकी, धर्मांध, नक्षली, बोडो, खलिस्तानी, ‘तुकडे गँग’, पुरोगामी आणि त्यांना साथ देणारे हिंदुविरोधी राजकीय पक्ष अन् प्रसारमाध्यमे यांच्यामुळे ‘युद्धकाळात अंतर्गत शांतता बिघडली’, अशी स्थिती निर्माण होऊ शकते. भारतियांनी प्रखर राष्ट्रवादाचा पुरस्कार करणे आवश्यक आहे !

रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धाची शक्यता

रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रशियाने युक्रेनच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर रणगाडे (टँक), तोफा, युद्धात वापरली जाणारी वाहने आणि सैनिक तैनात केले आहेत.

पुढील ९ वर्षांत जगातील ९ मोठी शहरे बुडणार !

‘क्लायमेट सेंट्रल’ नावाच्या प्रकल्पाच्या अंतर्गत एका अहवालात म्हटले आहे की, ‘समुद्राच्या पातळीत वाढ झाल्यास सर्वाधिक धोका कोणत्या शहरांना बसेल ?’ याची सूची या अहवालात देण्यात आली आहे. यामध्ये भारतातील कोलकाता शहराचा समावेश आहे.