‘सितरंग’ चक्रीवादळामुळे बांगलादेशात २४ ठार, २ लाखांहून अधिक लोकांना फटका

पूर्वोत्तर भारतातही धोक्याची चेतावणी

नवी देहली – ‘सितरंग’ चक्रीवादळामुळे बांगलादेशमध्ये किमान २४ जणांचा मृत्यू झाला असून वादळापासून बचाव करण्यासाठी देशातील १५ जिल्ह्यांतील २ लाख १९ सहस्रांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

या वादळाने भारतातही प्रवेश केला असून भारतीय हवामान खात्याने अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मणीपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांना धोक्याची चेतावणी दिली आहे. या राज्यांमध्ये अतीमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पूर्वोत्तर भारताच्या राज्यांत १०० ते ११० किमी प्रतिघंटा या वेगाने वारे वाहत आहेत. बंगाल आणि ओडिशा येथील अनेक जिल्ह्यांमध्येही पाऊस झाला आहे.

Leave a Comment