२४० कि.मी. वेगात अमेरिकी किनारपट्टीला धडकले ‘इयान’ चक्रीवादळ !

शार्क मासेही दिसले रस्त्यावर !

फ्लोरिडा (अमेरिका) – ‘इयान’ चक्रीवादळाने २४० किलोमीटर वेगाने फ्लोरिडामध्ये धडक दिली आहे. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यांमुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. यात अनेक गाड्या वाहून गेल्या आहेत. समुद्रातील शार्क मासेही शहरातील रस्त्यांवर दिसून येत आहेत.

या चक्रीवादळामुळे मोठी हानी झाली आहे. आतापर्यंत अमेरिकेत आलेल्या चक्रीवादळांपैकी ‘इयान’ चक्रीवादळ हे सर्वांत शक्तीशाली असल्याचे सांगण्यात येत आहे. वादळामुळे संपूर्ण फ्लोरिडा, जॉर्जिया आणि दक्षिण कॅरोलिना या दक्षिण-पूर्व राज्यांमध्ये लाखो लोक पूरग्रस्त होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment