वर्धा येथे ३ ठिकाणी सनातन संस्था आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सव चैतन्यमय वातावरणात साजरा !

सनातन संस्थेच्या वतीने १३ जुलै या दिवशी येथील संताजी सभागृह आणि यमुना लॉन, तर हिंगणघाट येथील संत कँवरराम भवन या ३ ठिकाणी चैतन्यमय वातावरणात ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ साजरा करण्यात आला.

गुरूंविषयी श्रद्धा, भक्तीभाव निर्माण करा ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सनातन संस्थेच्या वतीने १० जुलै या दिवशी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ‘ऑनलाईन’ विशेष सत्संग आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी पू. रमानंद गौडा यांनी गुरु-शिष्य परंपरेविषयी मार्गदर्शन केले. या सत्संगाचा लाभ ३ सहस्रांहून अधिक जणांनी घेतला.

संभाजीनगर, जालना, धुळे, नंदुरबार येथे सनातनच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला लाभलेला उदंड प्रतिसाद !

संभाजीनगर येथील विवेकानंद महाविद्यालयाच्या वाचनालयात संपर्क करून ग्रंथांविषयी सांगितल्यावर त्यांनी मराठी आणि इंग्रजी ग्रंथ संचांची मागणी दिली.

हडपसर (पुणे) येथे महिलांच्या स्नेह मेळाव्यात ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ प्रवचनाला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद !

हडपसर येथे हांडेवाडी येथे १२ जून या दिवशी ‘सुनबाई घुले पाटलांच्या ग्रुप’च्या तृतीय वर्धापनदिनाच्या निमित्ताने नणंद-भावजयींचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात सनातन संस्थेच्या वतीने कु. क्रांती पेटकर यांनी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शन केले.

सनातन संस्थेच्या वतीने उत्तरप्रदेशमध्ये ठिकठिकाणी ‘ऑनलाईन’ साधना सत्संगातील जिज्ञासूंसाठीच्या कार्यशाळा पार पडल्या !

कार्यशाळांमध्ये उपस्थित सर्व जिज्ञासूंनी साधनेमुळे त्यांच्यात झालेले पालट सांगितले. त्यामुळे उपस्थितांमध्ये साधनेविषयी श्रद्धा आणि तळमळ वाढण्यास साहाय्य झाले.

एर्नाकुलम् (केरळ) येथे आयोजित केलेल्या साधनाविषयक प्रवचनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

एर्नाकुलम् येथील तम्मनम्मधील नालंदा सभागृहामध्ये झालेल्या एका कौटुंबिक कार्यक्रमामध्ये सनातन संस्थेच्या साधिका सौ. शालिनी सुरेश यांनी साधनेविषयी जिज्ञासूंना मार्गदर्शन केले.

वाशी (नवी मुंबई) येथे सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन कक्षाचे आयोजन !

वाशी, नवी मुंबई येथे बीएएन्एम् बांधकाम व्यावसायिकांच्या वतीने १३ ते १६ मे २०२२ या कालावधीत प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन कक्ष उभारण्यात आला आहे.

कोल्हापूर येथे भव्य ‘हिंदू एकता दिंडी’च्या माध्यमातून ‘हिंदु राष्ट्रा’चा हुंकार !

कोल्हापूर येथे २ सहस्रांहून अधिक हिंदूंनी चैतन्यमय हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून चेतवले हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिंग !

तळमळीने सेवा केली, तर त्याची फलनिष्पत्ती वाढते ! – सद्गुरु सत्यवान कदम, धर्मप्रचारक, सनातन संस्था

आपली साधना खडतर आणि कठोर असली, तरच ईश्वर प्रकट होईल. साधना करणे जीवनाचा अविभाज्य घटक आहे. येत्या काळात साधनेविना तरणोपाय नाही. या काळात साधनेमुळेच मनोबल वाढेल. यासाठी आपण करत असलेली साधना गुणात्मक करूया.

अमरावती येथे भगवान परशुराम जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा !

येथे शहरात ३ मे या दिवशी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने भगवान परशुराम जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.