संभाजीनगर, जालना, धुळे, नंदुरबार येथे सनातनच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला लाभलेला उदंड प्रतिसाद !

 

१. संभाजीनगर

१ अ. संभाजीनगर येथील विवेकानंद महाविद्यालयाच्या वाचनालयात संपर्क करून ग्रंथांविषयी सांगितल्यावर त्यांनी मराठी आणि इंग्रजी ग्रंथ संचांची मागणी दिली.

१ आ. येथील उद्योजक श्री. सौरभ भोगले यांना ग्रंथ दाखवल्यावर त्यांनी ग्रंथ संच घेतला.

 

२. जालना

२ अ. हिंदुत्वनिष्ठ श्री. रवी राऊत यांनी दीपावलीनिमित्त कार्यकर्त्यांना देण्यासाठी ग्रंथ घेणे

येथील एक हिंदुत्वनिष्ठ श्री. रवी राऊत यांना संपर्क करून ग्रंथ दाखवले आणि ‘ते दीपावलीच्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्त्यांना ग्रंथ भेट देऊ शकतात’, असे सुचवले. लगेच त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना भेट देण्यासाठी काही ग्रंथांचे संच घेतले.

२ आ. बालाजी मंदिरात आलेली अनुभूती !

२ आ १. एका हितचिंतकाने ग्रंथांचे ५ संच घेऊन त्यातील एक संच श्री बालाजी मंदिरात देण्यास सांगणे

एका हितचिंतकाने ग्रंथांचे ५ संच घेतले आणि त्यांपैकी एक संच त्यांनी तेथील श्री बालाजी मंदिरामध्ये द्यायला सांगितला. बालाजी मंदिरातील महाराजांनी ते ग्रंथ श्री बालाजीच्या चरणी मांडणी करून ठेवले. श्री बालाजी म्हणजे श्री विष्णूचा अवतार आणि ग्रंथांचे लेखकही श्रीविष्णूचे अवतार, म्हणजे श्री जयंत अवतार (परात्पर गुरु डॉ. आठवले) ! श्रीविष्णूने आपलेच ग्रंथ आपल्या चरणी घेतले. (‘महर्षींनी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीविष्णूचे अंशावतार आहेत’, असे नाडीपट्टी वाचनाच्या वेळी सांगितले आहे.’ – संकलक)

तेवढ्यात भोग लावण्यासाठी (नैवेद्य दाखवण्यासाठी) गर्भगृहाचे द्वार बंद झाले. त्यानंतर गर्भगृहाचे दार उघडल्यावर एका साधिकेला श्री बालाजीच्या ठिकाणी चतुर्भुज रूपात स्मितहास्य करीत असलेल्या प.पू. गुरुमाऊलीचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) दर्शन झाले.

२ इ. सनातन संस्थेविषयी समाजात असलेला आदर आणि श्रीराम मंदिरात आलेली अनुभूती

येथील श्रीराम मंदिरात संपर्काला गेल्यावर तेथील महाराज म्हणाले, ‘‘तुमच्या कार्याला माझा नमस्कार !’’ यावरून ‘सनातन संस्था आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी समाजातील लोकांमध्ये पुष्कळ आदर आहे’, हे लक्षात आले.

साधिकांनी श्रीरामाला भावपूर्ण नमस्कार केल्यावर एका साधिकेला परात्पर गुरु डॉ. आठवले श्रीराम रूपात दिसले. ‘ते स्मितहास्य करत साधकांकडे कौतुकाने पहात आहेत’ असे जाणवले.

परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांना अशा अनुभूती देत आहेत. ते साधकांना आनंद देऊन त्यांचा उत्साह वाढवत आहेत आणि ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविशी हाती धरोनिया ।।’ या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाची जणू प्रचीतीच देत आहेत.

२ ई. एका उद्योजकांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना देण्यासाठी ग्रंथ घेणे

येथील एका उद्योजकांना ग्रंथाची माहिती सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘हे ग्रंथ पुष्कळ चांगले आहेत आणि ते पुष्कळ महत्त्वाचे आहेत.’’ त्यांनी लगेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांना भेट देण्यासाठी ग्रंथांची मागणी दिली.

२ उ. श्री साई मंदिराच्या विश्वस्तांनी ग्रंथांची मागणी देणे

श्री साई मंदिराचे विश्वस्त श्री. महेश अग्रवाल यांना संपर्क केला. त्यांना हे कार्य आधीच ठाऊक होते. त्यांना ग्रंथांची सूची दाखवल्यानंतर त्यांनी मोठ्या ग्रंथांची मागणी दिली.

 

३. धुळे

३ अ. ‘धुळे एज्युकेशन सोसायटी’कृडून मिळालेला उत्तम प्रतिसाद

‘धुळे एज्युकेशन सोसायटी’ या शिक्षण संस्थेच्या सचिवांनी मुख्याध्यापकांची बैठक आयोजित करून त्यांच्या ३ शाळांसाठी विविध ग्रंथांची मागणी दिली. ते आम्हाला म्हणाले, ‘‘आमच्या संस्थेतील २८० शिक्षकांसाठी प्रत्येक मासांतून एकदा सत्संग आणि महाविद्यालयामधील युवतींसाठी शौर्यजागृती शिबिर घ्या.’’ त्यांनी क्रांतीकारकांचे ‘फ्लेक्स’ त्यांच्या शाळांमध्ये लावण्याची अनुमती दिली.

३ आ. धुळे येथील उद्योजक अजिंक्य ऑईल मिलचे मालक श्री. महेश नवरकर यांनी मोठ्या प्रमाणात ग्रंथ घेणे

धुळे येथील उद्योजक ‘अजिंक्य ऑईल मिल’चे मालक श्री. महेश नवरकर हे कार्य ऐकून प्रभावित झाले. त्यांनी स्वतःच्या कुटुंबियांसाठी ग्रंथ संच घेतला आणि लगेच त्याचा धनादेश दिला. ते म्हणाले, ‘‘मी शेंगदाणे अर्पण देतो. ते कधी आणि कुठे पाठवायचे ?’, ते सांगा.’’

३ इ. धुळे येथील अधिवक्ता ललित गायकवाड यांनी ग्रंथसंच घेऊन
रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला भेट देण्याची तीव्र इच्छा व्यक्त करणे

धुळे येथील अधिवक्ता ललित गायकवाड यांना सनातन संस्थेचे कार्य पुष्कळ आवडले. त्यांनी रामनाथी आश्रमाला भेट देण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली. त्यांनी ग्रंथ संच घेतला. ते दैनिक ‘सनातन प्रभात’चे वार्षिक वर्गणीदारही झाले.

३ ई. धुळे येथील धर्मप्रेमी श्री. मयूर बागुल यांनी स्वतःच्या लग्नात आलेल्या सर्व पाहुण्यांमध्ये २०० ग्रंथ भेट दिले.

पाहुण्यांना ते ग्रंथ आणि त्याची मुखपृष्ठे पुष्कळ आवडली. पाहुण्यांपैकी काही महिलांनी आणखी काही ग्रंथांची मागणी दिली.

 

४. नंदुरबार

४ अ. नंदुरबार येथील श्री. राजेंद्र गावित यांनी ‘आध्यात्मिक कार्यासाठी तुमचे साहाय्य हवे’, असे सांगणे

नंदुरबार येथील आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी, नटावद जिल्हा नंदुरबार या शिक्षणसंस्थेचे श्री. राजेंद्र गावित यांच्या बऱ्याच शैक्षणिक संस्था आहेत. ते स्वतः आध्यात्मिक आणि सात्त्विक वृत्तीचे आहेत. त्यांना विविध अनुभूतीही येतात. त्यांनी सांगितले, ‘‘आम्ही सामाजिक आणि राजकीय कार्य करतो; परंतु आम्हाला आध्यात्मिक कार्यासाठी तुमचे साहाय्य अन् मार्गदर्शन हवे आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात ग्रंथांची मागणी केली. आणि सर्व रक्कम धनादेशाच्या स्वरूपात जमा केली.

४ आ. सर्व ग्रामीण भागातील मंदिरांमध्ये छोटी वाचनालये चालू करून त्यासाठी
वेगळी मागणी देणार असलेले तळोदा, नंदुरबार येथील भाजपचे आमदार श्री. राजेश पाडवी !

तळोदा, नंदुरबार येथील भाजपचे आमदार श्री. राजेश पाडवी यांनी संपर्कासाठी २ घंटे वेळ देऊन संपूर्ण कार्य जाणून घेतले आणि आमदार निधीतून ग्रंथ खरेदीसाठी त्यांनी पत्र दिले. ते म्हणाले, ‘‘माझ्या प्रभागातील सर्व ग्रामीण भागातील मंदिरांमध्ये छोटी वाचनालये चालू करून त्यासाठी वेगळी मागणी देतो. मी रामनाथी येथील सनातनचा आश्रम पहाण्यासाठी नक्की येईन.’’ ते सर्व मंदिरांमध्ये ‘फ्लेक्स’ लावण्याचे नियोजन करण्यासही सिद्ध आहेत.’

– सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था.

या लेखात/ कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Leave a Comment