हडपसर (पुणे) येथे महिलांच्या स्नेह मेळाव्यात ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ प्रवचनाला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद !

हडपसर (जिल्हा पुणे) – येथील हांडेवाडी येथे १२ जून या दिवशी ‘सुनबाई घुले पाटलांच्या ग्रुप’च्या तृतीय वर्धापनदिनाच्या निमित्ताने नणंद-भावजयींचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात सनातन संस्थेच्या वतीने कु. क्रांती पेटकर यांनी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी ७५ हून अधिक महिला जिज्ञासू उपस्थित होत्या. या कार्यक्रमात महिलांना साधनाविषयक मार्गदर्शन मिळावे यासाठी श्री. रवींद्र घुले, सौ. मंगल घुले, सौ. दीपमाला घुले यांनी पुढाकार घेऊन प्रयत्न केले.

 

विशेष

१. प्रवचन चालू असतांना उपस्थित सर्व महिला एकाग्रतेने विषय ऐकत होत्या आणि त्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसादही देत होत्या.

२. प्रवचनानंतर अनेकांनी स्वतःहून येऊन ‘आजचा विषय सध्याच्या काळात पुष्कळ आवश्यक असून आम्हाला पुष्कळ आवडला. आम्ही त्यानुसार प्रयत्न करू’, असे सांगितले.

३. काहींनी ‘सनातन चैतन्यवाणी ॲप’ डाऊनलोड केले.

४. अनेकांनी सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली, तसेच ऑनलाईन सत्संगाला जोडण्याचीही इच्छा व्यक्त केली.

Leave a Comment