सनातन संस्थेच्या वतीने उत्तरप्रदेशमध्ये ठिकठिकाणी ‘ऑनलाईन’ साधना सत्संगातील जिज्ञासूंसाठीच्या कार्यशाळा पार पडल्या !

वाराणसी (उत्तरप्रदेश) – गेल्या वर्षभरापासून ‘ऑनलाईन’ माध्यमातून साधना सत्संगामध्ये उपस्थित रहाणार्‍या जिज्ञासूंसाठी सनातन संस्थेच्या वतीने नुकतेच प्रयागराज, भदोही, सैदपूर आणि वाराणसी या ठिकाणी कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पू. नीलेश सिंगबाळ यांनी उपस्थितांना पुढील साधनेविषयी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अलौकिक कार्याविषयी माहिती देण्यात आली, तसेच आध्यात्मिक स्तरावरील उपाय आणि गुरुपौर्णिमेचे महत्त्व यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळांमध्ये उपस्थित सर्व जिज्ञासूंनी साधनेमुळे त्यांच्यात झालेले पालट सांगितले. त्यामुळे उपस्थितांमध्ये साधनेविषयी श्रद्धा आणि तळमळ वाढण्यास साहाय्य झाले. या कार्यशाळांमध्ये अनेक जिज्ञासू आणि साधक उपस्थित होते.

पू. नीलेश सिंगबाळ

 

क्षणचित्रे

१. भदोही येथे ‘जय हिंद शिक्षा निकेतन’चे व्यवस्थापक आणि ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. सत्यशील जायसवाल यांनी त्यांच्या विद्यालयाचे सभागृह उपलब्ध करून दिले, तसेच सर्वांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. या वेळी त्यांचे पुत्र श्री. शिरीष जायसवाल कार्यशाळेच्या सेवेत सहभागी झाले.

२. धर्मप्रेमी श्री. अविनाश यादव यांनी ध्वनीक्षेपक यंत्रणा, तर हितचिंतक श्री. विक्की दुबे यांनी विद्युत्जनित्र विनामूल्य उपलब्ध करून दिले.

३. प्रयागराजमध्ये हिंदुत्वनिष्ठ श्री. अशोक पाठक यांनी वातानुकूलित सभागृह विनामूल्य उपलब्ध करून देण्यासह पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली.

४. सैदपूर येथे हितचिंतक श्री. वसंत पांडे यांनी त्यांच्या विद्यालयाचे सभागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि विद्युत्जनित्र विनामूल्य उपलब्ध करून दिले.

Leave a Comment