एर्नाकुलम् (केरळ) येथे आयोजित केलेल्या साधनाविषयक प्रवचनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

मार्गदर्शन करतांना सनातन संस्थेच्या साधिका सौ. शालिनी सुरेश

एर्नाकुलम् (केरळ) – एर्नाकुलम् येथील तम्मनम्मधील नालंदा सभागृहामध्ये झालेल्या एका कौटुंबिक कार्यक्रमामध्ये सनातन संस्थेच्या साधिका सौ. शालिनी सुरेश यांनी साधनेविषयी जिज्ञासूंना मार्गदर्शन केले. या वेळी सौ. शालिनी सुरेश यांनी ‘कुलदेवतेच्या नामजपाचे महत्त्व, नामजप कसा करावा ? पितृदोष कसे ओळखायचे आणि ते दूर करायला काय करावे ? समाजाची सद्यःस्थिती आणि त्यावरील उपाय’ यांविषयी माहिती सांगितली.

‘हिंदूंनी आता ‘मी आणि माझा परिवार’ यामधून बाहेर येऊन व्यापक व्हावे अन् स्वतःमध्ये कौटुंबिक भावना निर्माण करावी’, असेही त्या म्हणाल्या. या कार्यक्रमात अनेक जिज्ञासू उपस्थित होते. या वेळी जिज्ञासूंनी विषय पुष्कळ आवडल्याचे सांगितले.

Leave a Comment