सोलापूर जिल्ह्यात ३ ठिकाणी, तर लातूर, धाराशिव आणि बारामती येथे भावपूर्ण वातावरणात पार पडला सनातन संस्था आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सव !

गुरुपौर्णिमेचा उद्देश केवळ गुरुचरणी नतमस्तक होणे, हा नसून या दिवशी गुरुसेवेची ही अमूल्य पर्वणी मिळते. आत्मज्ञान हे केवळ गुरूंमुळे प्राप्त होते, त्यासाठी नियमित गुरुसेवा करणे आवश्यक आहे. गुरूंना जे आवडते, ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करायला हवा.

गुरुपौर्णिमा निमित्त बेंगळुरू (कर्नाटक) येथील आचार्य श्री महाप्रज्ञा शाळेत सनातन संस्था द्वारा आयोजित प्रवचन संपन्न

जीवनात संस्कारांना पुष्कळ महत्त्व आहे. भक्त प्रल्हाद हिरण्यकश्यपु नावाच्या राक्षसाचा पुत्र असूनही धर्माने त्याचा आदर्श घेण्यास सांगितले. त्यामुळे कुठे जन्म झाला ? यापेक्षा कोणते संस्कार झाले आहेत, हे मुख्य मानले गेले आहे. त्यामुळे आपण सर्वजण उत्तम संस्कार वाढवून देशाचे उत्तम नागरिक होऊया

जळगाव, चोपडा, धुळे, ब्रह्मपूर येथे सनातन संस्था आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरे !

जळगाव, चोपडा, धुळे, ब्रह्मपूर येथे गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरा ! प्रत्येकाने धर्मशिक्षण घेऊन आणि धर्माचरण करून धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती अन् धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कृतीशील झाले पाहिजे.

वर्धा येथे ३ ठिकाणी सनातन संस्था आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सव चैतन्यमय वातावरणात साजरा !

सनातन संस्थेच्या वतीने १३ जुलै या दिवशी येथील संताजी सभागृह आणि यमुना लॉन, तर हिंगणघाट येथील संत कँवरराम भवन या ३ ठिकाणी चैतन्यमय वातावरणात ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ साजरा करण्यात आला.