अमरावती येथील हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेत सनातन संस्थेचा सहभाग !

येथे १२ आणि १३ ऑगस्ट अशी दोन दिवसीय हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा पार पडली. उत्तम संघटक बनण्यासाठी साधना करून स्वभावदोष अन् अहं निर्मूलन प्रकियाही राबवणार, असा निर्धार येथे करण्यात आला.

संभाजीनगर येथे १५ ऑगस्टनिमित्त जिल्हाधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना सनातन संस्थेच्या वतीने निवेदन

संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी श्री. नवल राम यांना १५ ऑगस्टनिमित्त निवेदन देण्यात आले.

चीनला अद्दल घडवण्यासाठी चिनी वस्तूंच्या विक्रीवर निर्बंध घाला ! – तहसीलदारांना निवेदन

भारतीय सीमेत घुसखोरी करणार्‍या आणि भारताला युद्धाची धमकी देणार्‍या चीनला अद्दल घडवण्यासाठी चिनी वस्तूंच्या विक्रीवर निर्बंध घाला, या मागणीचे निवेदन येथील तहसीलदार रंजना उंबरहंडे यांना देण्यात आले.

विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनांत सनातन संस्थेचा सहभाग !

येथे ३० जुलै या दिवशी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी चिनी वस्तूंची खरेदी आणि विक्री करू नये, यासाठी भव्य जनजागृती फेरी काढली. यात मोठ्या संख्येने महिला आणि युवा वर्ग सहभागी झाला होता.

नंदुरबार येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या माध्यमातून चिनी वस्तूंची होळी

आपल्या राष्ट्राशी शत्रुत्व ठेवणार्‍या देशाने उत्पादित केलेल्या वस्तू वापरणे वा विकत घेणे म्हणजे शत्रूराष्ट्राला मजबूत करण्यासारखेच असल्याने चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला, असे आवाहन येथील विविध हिंदुप्रेमी संघटनांनी राष्ट्रीय हिंदू आंदोलनात केले.

सरकारने चीनची आर्थिक नाकेबंदी करावी : यवतमाळ येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

कैलास मानसरोवर यात्रेसाठी जाणार्‍या भारतियांना नाथुला खिंडीतून जाण्यास चीनने प्रतिबंध घातला, तसेच सिक्किमच्या डोकलाम भागात सीमारेषा पार करून दोन भारतीय बंकर उद्ध्वस्त केली. असे असूनही सरकार चीनशी व्यापार वाढवत आहे.

चिनी ‘ड्रॅगन’ला रोखण्यासाठी चिनी वस्तू आणि राख्या यांवर बहिष्कार घाला ! – आंदोलनाद्वारे एकमुखी मागणी

कुरापतखोर अरुणाचल प्रदेश आणि लडाख येथे सीमावाद चालू ठेवण्यासमवेत आता सिक्कीममध्येही घुसखोरी करत डोकलाम हा चीनचा भूभाग असल्याचे चीन सांगत आहे. असे असतांनाही भारत चीनशी व्यापार वाढवत आहे आणि चिनी ‘ड्रॅगन’ भारताच्या घराघरांत पोहोचवत आहे.

जय जवान गणेशोत्सव मंडळात धर्मशिक्षण आणि क्रांतीकारकांची माहिती देणारे फ्लेक्सप्रदर्शन !

६ ते ९ सप्टेंबर या कालावधीत लावलेल्या या प्रदर्शनाचा लाभ ६०० हून अधिक जिज्ञासूंनी घेतला. पोलीस उपनिरीक्षक श्री. रत्नदीप साळोखे यांनी प्रदर्शन पाहून अन्य गोष्टींना फाटा देऊन एक चांगला उपक्रम राबवल्यामुळे मंडळातील कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.

सनातन संस्थेची वैशिष्ट्ये

सनातन संस्थेची स्थानपा राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती करण्यासाठी झाली. प्रत्यक्ष जीवनात ‘अध्यात्म’ जगायला शिकवणारी सनातन संस्था !

स्थापना, उद्देश, वैशिष्ट्ये

आंतरराष्ट्र्रीय कीर्तीचे मानसोपचारतज्ञ आणि संमोहन उपचारतज्ञ असलेले परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे ‘सनातन संस्थे’चे प्रेरणास्थान आहेत.